Valpoi Dainik Gomantak
गोवा

Valpoi: वाळपईत वाहतुकीची कोंडी, रस्त्यालगतची कामे ठरतायेत डोकेदुखी; वाहनांच्या लागतात रांगा

Valpoi Traffic Jam: वाळपई शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या जटील झालेली आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: वाळपई शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या जटील झालेली आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान वाळपई मुख्य बाजारात वाहनांच्या रांगा दिसून आल्या. वाळपई पणजी मार्गावर ही कोंडी अधिक प्रमाणावर झाली होती. त्यामुळे लोकांना याचा नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

वाळपई शहरात अनेक वर्षापासून वाहतूक आराखडा तयार केलेला जातो. त्यासंबंधी बैठकाही घेतल्या गेल्या आहेत. कागदावर,फलक लावून कार्यवाही केली जाते. पण, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होत आहे.

सध्या वाळपई शहरात रस्त्यालगत सरकारी कामे सुरु आहेत. रस्ते खोदून जलवाहिनी घालण्याची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. शहरात अंतर्गत, मुख्य रस्ते खणले आहेत. पाईप लाईन घालून रस्ते मातीने भरले जातात. चांगले रस्ते खणले जात आहेत.

वाळपई पोलीस स्थानक क्षेत्र ते पणजी मार्गावरील प्रथम दंडाधिकारी न्यायालयापर्यंत रस्त्याच्या बाजूंनी ‘नो पार्किंग झोन’ असे सूचना करणारे फलक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे ‘नो पार्किंग’ ची अंमलबजावणी प्रत्यक्षात उतरविण्याची गरज आहे. परंतु वाढती वाहनांची संख्या व वाळपई शहरातील कमी जागा अशा अवस्थेत या सूचनांचे पालन वाहन चालकांकडून होणे कठीण होऊन बसले आहे.

वाहतूक व्यवस्थापन ढासळलेले

सत्तरी जागरूक युवा मंचच्या कार्यकत्यांनी वाळप‌ईतील वाहतूक समस्येबाबत उपजिल्हाधिकारी व इतर संबंधित कार्यालयात पाठपुरावा करून वाळप‌ईसाठी २०१८ मध्ये वाहतूक आराखडा पास करून घेतला होता. पण, अजुन त्याची कार्यवाही करण्यात आली नाही.

वाळपईत नावापुरते फलक लावण्यात आले आहेत. पण, कार्यवाही कुठेच नाही. हल्लीच एक युवक खड्ड्यात मोटरसायकल घेऊन पडून गंभीर जखमी झाला होता. आपण याविषयी हल्लीच डिचोलीचे वाहतूक अधिकारी पराडकर यांच्याशी बोललो आहे, असे सत्तरी जागरुक युवा मंचचे विश्वेश प्रभू यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New BJP President: नितीन नबीन भाजपचे नवे 'सारथी'! अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड

रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT