Valpoi Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : ‘ती’ रेखाचित्रे नवाश्म युगातील : राजेंद्र केरकर

Valpoi News : ‘‘परिक्रमा’ उपक्रमामुळे मिळते ऐतिहासिक स्थळांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, २००४ साली झर्मे नदीत म्हाऊस रवळनाथ देवस्थानच्या प्रांगणामध्ये वाळू उत्खनन करीत असताना गावातील काहीजणांनी दगडावर काही प्रमाणात कोरलेली चित्रे पाहिली. याची माहिती इतिहास संशोधक राजेंद्र केरकर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षपणे भेट देऊन पाहणी केली असता ती प्रस्तर रेखाचित्रे ही नवाश्म युगातील असल्याचे स्पष्ट झाले.

या गावात ही रेखाचित्रे सापडल्याने गावाला ऐतिहासिक स्वरूपाचे महत्त्व प्राप्त झाले. सरकारने याची विशेष दखल घेऊन हा परिसर संरक्षित असल्याचे घोषित केले.

गोव्यातील तरुण वर्गाला व इतिहासाची आस्था असलेल्या इतिहासप्रेमींना याची सविस्तरपणे माहिती मिळावी व गावाचा सांस्कृतिक इतिहास प्रकाशझोतात यावा यासाठी ‘परिक्रमा’ विशेष उपक्रम सुरू केलेला आहे. गेल्या एक वर्षापासून त्याची सुरुवात झालेली आहे. म्हाऊस येथे आयोजित करण्यात आलेली ही अकरावी परिक्रमा आहे. गोव्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या इतिहासप्रेमी व नागरिकांच्या उपस्थितीत इतिहास संशोधक राजेंद्र केरकर यांनी प्रस्तर रेखाचित्रांसंदर्भात सविस्तरपणे माहिती दिली.

‘झेब्बू’द्वारे शेतीकाम

२००४ साली म्हाऊस गावामध्ये प्रस्तर रेखाचित्रांच्या माध्यमातून नवाश्म युगाच्या अस्तित्वाच्या खुणा झेब्बू (बैल) याच्या रूपाने सापडल्या आहेत. नवाश्म युगामध्ये रानबैल होते. हे बैल ताकदवान होते. या बैलांचा वापर करून त्यावेळच्या मानवाने शेतीची कामे केली होती. त्यांचा शेतीसाठी वापर करण्यात आला होता. यामुळे नवाश्म युगातही शेतीकाम सुरू होते, हे स्पष्ट झाल्याचे राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

संरक्षित भाग म्हणून घोषित

म्हाऊस येथे रवळनाथ देवस्थानच्या प्रांगणात सापडलेली झर्मे नदीच्या काठावरील ही प्रस्तर रेखाचित्रे या झेब्बू बैलांची आहेत. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारच्या खुणा सापडल्या आहेत. मात्र, म्हाऊस येथे सापडलेल्या खुणा या विशिष्ट पद्धतीच्या आहेत. सुमारे २० खुणा सापडलेल्या आहेत. यामुळे गावाचा सांस्कृतिक वारसा सिद्ध झाला असून सरकारने हा भाग संरक्षित म्हणून घोषित केलेला आहे.

युवा वर्गाला या इतिहासाची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ‘परिक्रमा’ हा विशेष उपक्रम आयोजित केला जातो. यापूर्वी गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ११ ठिकाणी अशाप्रकारचे उपक्रम आयोजित केले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून संबंधित गावांचा ऐतिहासिक वारसा समोर आणण्याची संधी उपलब्ध असते.

- राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT