Valpoi Crime Dainik Gomantak
गोवा

Valpoi Crime: वाळपईत नग्नावस्थेत कपडे चोरायचा चोरटा; जाब विचारचात म्हणाला, 'ही माझी पॅशन', पोलिसांनी शिकवला धडा

Valpoi Shocking Incident: शहरातील वॉर्ड क्रमांक ७ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

वाळपई: शहरातील वॉर्ड क्रमांक ७ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक रहिवाशांनी एका व्यक्तीला नग्नावस्थेत कपडे चोरताना रंगेहात पकडलं आहे. हा व्यक्ती घरांसमोरील अंगणात व सुकत ठेवलेले कपडे चोरत असल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलं.

सकाळच्या सुमारास रहिवाशांना परिसरात काहीतरी संशयास्पद हालचाल जाणवली. नागरीकांनी एका नग्नावस्थेत असलेल्या एका व्यक्तीला कपडे गोळा करताना पाहिले. हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी त्याला पकडले.

पकडल्यानंतर या युवकाला जाब विरारला असता, त्यानं दिलेल्या उत्तरानं उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झालं. "माझी हीच आवड आहे. जुने आणि वापरलेले कपडे गोळा करणे हे माझे पॅशन आहे," असं तो युवक म्हणाला.

घटनेची माहिती मिळताच रहिवाशांनी पोलिसांना संपर्क केला. मात्र, पोलिसांच्या येण्याआधीच हा संशयित व्यक्ती जवळच्या झुडुपांमध्ये पळून गेला. झुडुपांमध्ये त्याने आधीच चोरी केलेले कपडे लपवले होते. काही वेळाने त्याने ते कपडे स्वतः घालून पोलिसांसमोर शरण जाण्याचा निर्णय घेतला.

वाल्पोई पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयिताला अटक केली आणि त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर रहिवाशांमध्ये मोठा संताप पसरला आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT