valpoi sattari dhave bibati trees Dainik Gomantak
गोवा

Bibati Tree: गोव्यात आढळले दुर्मीळ ‘बिबटी झाड’! जगात 8वे तर राज्यात दुसरे असल्याचा दावा; मलबार फुलपाखरांचाही अधिवास

valpoi sattari dhave bibati trees: धावे गावात वनखात्याच्या क्षेत्रात धारखंड रस्त्यावर बिबे भाग म्हणून परिचित आहे. कारण या भागात दुर्मीळ अशा बिब्या (बिबटी) झाडांचे अस्तित्व दिसून येते.

Padmakar Kelkar

वाळपई : सत्तरी तालुका म्हादई अभयारण्य, वन विभाग असा परिसर निसर्ग संपदेने नटलेला आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे गावात वनखात्याच्या क्षेत्रात धारखंड रस्त्यावर बिबे भाग म्हणून परिचित आहे. कारण या भागात दुर्मीळ अशा बिब्या (बिबटी) झाडांचे अस्तित्व दिसून येते. पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर व वनस्पती अभ्यासक होंडाच्या आसावरी कुलकर्णी यांनी धावे बिबे येथे दुर्मीळ अशा बिबटी झाडांची पाहाणी केली.

येथे मलबार नीम, मलबार अप्सरा राज्य फुलपाखरू सापडते. ते या झाडांचे परागीभवन करते. धावे बिबे येथे बिब्यांची तिथे लहान रोपटीही उगवली आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण बिबे (बिबटी) झाड आढळणारे धावे गाव अगदी जगात ८ वे तर गोव्यात दुसरे ठरू शकते. २०१३ साली ब्रह्मकरमळी गावात आजोबाची तळी, माळोली भागात प्रथमच असे बिब्यांचे झाडे आढळले होते.

हे झाड २० मीटरहून अधिक उंचीपर्यंत वाढू शकते. साल राखाडी तपकिरी असते. पानांचा पोत चामड्यासारखा असतो. फुले हिरवी असतात आणि फळे मांसल, राखाडी रंगाची असतात जी पिकल्यावर तपकिरी होतात. एकच किडनी आकाराचे बीज असते. फुलांचा हंगाम नोव्हेंबर ते मे असतो.

जगात अत्यंत संकटग्रस्त गणलेल्या वनस्पतींनी युक्त दलदलीतल्या वैशिष्टयपूर्ण जंगलाचा वनस्पती शास्त्र संशोधक आसावरी कुलकर्णी यांना लागला. सेमिकार्पस कातलेकानेन्सीस या अत्यंत संकटग्रस्त आणि दुर्मिळ वृक्षांनी आणि जैविक संपत्तीने समृद्ध असे हे जंगल सत्तरी-धावेत सरकारी कृषी फार्मच्या शेजारी आहे. तेथे अस्तित्वात असलेल्या लईराई धोंडांच्या स्थळामुळे पवित्र मानलेली आहे.

- राजेंद्र केरकर, पर्यावरण अभ्यासक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT