lights  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : नगरगावात वाहिन्यांची दुरुस्ती; तरीही विजेचा लपंडाव सुरूच

Valpoi News : गेले काही दिवस सत्तरीच्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव वाढला आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रात नवीन वीजवाहिनी घालण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तरीही नगरगाव पंचायत क्षेत्रात विजेचा लपंडाव सुरू होता. रात्रीदेखील वीज गुल होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, सत्तरी तालुक्यात सध्या वीज दुरुस्ती कामानिमित्त वीज खंडित केली जात आहे. तरी देखील रात्री विजेचा लपंडाव काही थांबलेला नाही.

सकाळी वीज दुरुस्तीसाठी ‘शटडाऊन’ आणि रात्रीचा विजेचा लपंडाव अशी स्थिती असल्याने भर उन्हाळ्यात उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. ऐन निवडणुकीच्या कालावधीत विकासाचा उदो उदो केला जात आहे, तर दुसरीकडे लोकांना पायाभूत सुविधाही दिल्या जात नाहीत.

गेले काही दिवस सत्तरीच्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव वाढला आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रात नवीन वीजवाहिनी घालण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तरीही नगरगाव पंचायत क्षेत्रात विजेचा लपंडाव सुरू होता. रात्रीदेखील वीज गुल होते.

भर उन्हाळ्यात नियमित वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. मंगळवारी दिवसभर वीज नव्हती. वीज मिनिटभर आली की, लगेच जाते. त्यामुळे आधीच उकाड्याने हैराण झालेली जनता अधिकच त्रस्त झाली आहे. सरकारी यंत्रणेने यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे.

- शिवाजी देसाई, ब्रह्मकरमळी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT