Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Police: एफआयआर नोंद दिरंगाई प्रकरणी वाळपई पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते निलंबित

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Crime महिला अत्याच्याराच्या गुन्ह्यांबाबत गोवा पोलिसांनी झीरो टॉलरन्स धोरण स्विकारलेले असले तरी दोन प्रकरणांत मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल हयगय केली होती. त्यावेळी पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यास नकार दिल्याचे समोर आले होते.

यासंदर्भातच एक महत्वाची बातमी हाती येतेय. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी वाळपई पीआय प्रज्योत फडते यांना निलंबित करण्यात आले आहे.

सत्तरीतील एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीची दखल घेण्यास बराच वेळ घेतल्याच्या आरोपावरून वाळपई पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रज्योत फडते यांना आज निलंबित करण्यात आले आहे.

सदरची तक्रार मुलींच्या पालकांनी उच्च अधिकाऱ्यांकडे केली होती. याची दखल घेत आज फडते यांचे निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहे. यामुळे वाळपई भागात खळबळ उडाली आहे.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार दहा दिवसापुर्वी सत्तरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तसेच धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार वाळपई पोलिसात केली होती.

मात्र त्या अल्पवयीन मुलीच्या पालकांना पोलिस तक्रार घेण्यास बराच वेळ घेतल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्यामुळे आज प्रज्योत फडते यांना निलंबित करण्यात आले आहे. सदरची पुढील चौकशी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT