Illegal Liquor Smuggling Dainik Gomantak
गोवा

Liquor Smuggling: गोव्यातून कर्नाटकात मद्याची तस्करी, चोर्ला घाटात पोलिसांची कारवाई; तिघेजण ताब्यात

Chorla Ghat Illegal Liquor Transport: चोर्लाघाट मार्गावर बेकायदा दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवून वाहनांची तपासणी सुरू केली होती.

Sameer Panditrao

वाळपई: वाळपई पोलिसांनी चोर्ला घाटातील जांबळीकडे येथे केलेल्या एका कारवाईत कर्नाटकात बेकायदा दारूची वाहतूक करणारे एक वाहन व तिघांना ताब्यात घेउन अबकारी विभागाच्या स्वाधीन केले.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोर्लाघाट मार्गावर बेकायदा दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवून वाहनांची तपासणी सुरू केली होती. यावेळी टाटा टिप्पर (क्र. केएल ११ एएफ ७११६) थांबवून तपासणी केली असता, या वाहनात दारूचा मोठा साठा सापडला.

या दारूबाबत वाहनचालकांकडे कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी वाहनासह या वाहनात असलेल्या तिघांना ताब्यात घेतले व वाळपईत आणून दारू असलेले वाहन व संशयितांना वाळपईतील अबकारी विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

ही दारू नेमकी किती किंमत आहे, हे अद्याप समजू नाही. या कारवाईचे नेतृत्व वाळपई पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रथमेश गावस व त्यांच्या पथकाने केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT