Goa Leopard Attack  Dainik Gomantak
गोवा

Leopard Attack: सत्तरीत बिबट्याचा थरार! मृत वासरू सापडले झाडीत, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Leopard Attack Sattari: सत्तरी येथे बिबट्याच्या हल्ल्याची घटना समोर आली असून, शेतकरी सुरेश गावकर यांच्या गोठ्यात बांधलेले वासरू बिबट्याने पळवून नेल्याची घटना २६ तारखेला मध्यरात्री घडली.

Sameer Panditrao

वाळपई: वाळपई तालुक्यातील खोडये-सत्तरी येथे बिबट्याच्या हल्ल्याची घटना समोर आली असून, शेतकरी सुरेश गावकर यांच्या गोठ्यात बांधलेले वासरू बिबट्याने पळवून नेल्याची घटना २६ तारखेला मध्यरात्री घडली.

सकाळी उठल्यानंतर गोठ्यात वासरू नसल्याचे लक्षात येताच सुरेश गावकर यांनी परिसरात शोध सुरू केला. तपासादरम्यान बिबट्याने वासराच्या मानगुटीला बांधलेली दोरी तशीच ठेवून वासरू पळवून नेल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर गावकर कुटुंबीयांनी शेजारील भागात वासराचा शोध सुरू ठेवला. अखेर गुरुवारी सायंकाळी गावालगतच्या झाडीत वासरू मृत अवस्थेत आढळून आले. बिबट्याने वासरू खाऊन उर्वरित अवशेष त्या ठिकाणीच टाकल्याचे दिसून आले आहे.

या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुधनावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडूनही घटनास्थळी पाहणी करून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT