home Industry Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : दीप्ती जोशी यांचे फणसाचे चिप्स, पापड पोहचले विदेशात

20 वर्षांच्या परिश्रमांना फळ : धावेतील सुगरणीची अन्न उद्योगातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi : उन्हाळी हंगामात काजू, कोकम, फणस या फळांचा घमघमाट सर्वांना भुरळ पाडतो. फणस तर सत्तरी तालुक्यात बागायतीत, रस्त्यालगत, शेता-बांधावर जागोजागी डोलताना दिसतात. पिकलेले फणस अनेकदा वाया जातात. त्यामुळे ते परिपक्व होण्याआधीच कच्च्या फणसापासून विविध टिकाऊ पदार्थ करण्याची किमया धावेतील दीप्ती दीपक जोशी यांनी साधली आहे. गोवा, महाराष्ट्रासह चक्क इंग्लंड, अमेरिका, दुबईतही त्यांच्या चिप्स, पापडांना मागणी असते. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे.

दीप्ती जोशी म्हणाल्या, कुळागरात फणस मोठ्या प्रमाणात पिकून गळून पडतात. त्यामुळे फणस परिपक्व होण्याअगोदरच कच्चे फणस काढून त्यापासून चिप्स, पापड करणे योग्य ठरेल, या विचाराने 20 वर्षांपूर्वी हा घरगुती लहानसा उद्योग सुरू केला. चिप्स किलोवर तर पापड नगाप्रमाणे विकले जातात. चिप्स करण्यासाठी पारंपरिक पध्दतीसह यंत्रांचीही मदत घेतली जाते.

चिप्सना मोठी मागणी असेल तर मशीनव्दारे कच्चे गरे लहान केले जातात. नाही तर विळीच्या साहाय्याने चिप्स बनविले जातात. चिप्स काळजीपूर्वक बनवावे लागतात. मुख्यत्वे तळताना ते जळणार नाहीत, तळून लाल भडक होणार नाहीत याची काळजी घेतली जाते. त्यामुळे हे पदार्थ रुचकर बनतात.

देश-विदेशात ख्याती

दीप्ती जोशी या गेली 20 वर्षे अन्न उद्योगाचा रितसर परवाना काढून कोल्हापूर येथून पदार्थांची प्रत तपासून हा नियोजनबद्ध व्यवसाय करत आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, तसेच हैदराबाद, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथेही त्यांची उत्पादने पोहचली आहेत. परदेशासह अन्य राज्यांत नातेवाईक, मित्र-परिवार यांच्या ओळखीने ही उत्पादने पोहोचवली जातात.

महिलांना रोजगाराची संधी

या व्यवसायामुळे कृषी खाते, जुने गोवे आयसीएआर या ठिकाणी मला महिलांच्या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थी शिक्षिका म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली. महिलांना प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ शिकविण्याचा आनंद वेगळाच असतो. या लहानशा उद्योगातून दरवर्षी दोन-तीन महिलांना रोजगारही मिळतो. शिवाय घरातील मंडळींचा देखील हातभार लाभतो, असे जोशी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT