Valpoi Health Centre Dainik Gomantak
गोवा

Goa Health Centre: सूचना फलक बसवून दोन महिने उलटले! वाळपई आरोग्य केंद्रासमोरील रस्त्यावर गतिरोधक कधी?

Goa Health Centre: वाळपई आरोग्य केंद्रासमोर त्वरित गतिरोधकाची मागणी ग्रामस्थांची केली होती.

दैनिक गोमन्तक

Goa Health Centre: वाळपई पणजी मुख्य मार्गावर असलेल्या सरकारी आरोग्य केंद्रासमोरील रस्त्यावर गतिरोधक घातला जाणार आहे, अशी सूचना करणारा फलक ऑक्टोबर महिन्यात बसविण्यात आला होता. पण दोन महिने लोटले, तरीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे गतिरोधक कधी घालणार? असा सवाल नागरिक करीत आहे.

वाहतूक पोलिस विभागाने सदर जागेची गतिरोधकासाठी सर्वेक्षण केले होते. त्याची दखल जिल्हाधिकारी कार्यालयातून घेण्यात आली होती. त्यामुळे आरोग्य केंद्रासमोर दोन गतिरोधक घालून कृती केली जाणार होती, तसा सूचना फलकही बसविण्यात आलेला आहे. हा मार्ग अतिशय रुंद आहे. मुख्य रस्ता असल्याने वाहनांची ये-जा सुरु असते.

आरोग्य केंद्रात जाणारे असंख्य रुग्ण, सोबतच नातेवाईक असतात. अशावेळी वाळपई पणजी, होंडा, फोंडा तसेच स्थानिक ठिकाणी येथे जाणारे वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवितात. अशावेळी अपघाताची मोठी भिती असते. या आधी काही अपघात झालेले आहेत.

त्यामुळे या मुख्य रस्त्यावर गतिरोधकाची गरज आहे. ती गरज ओळखून संबंधित खात्याकडून कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत. गतिरोधक असल्याचा फलक बसविण्यात आलेला आहे. रस्ता विभागाकडून लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT