Court Order, summons  Canva
गोवा

Dovorlim: सरपंचांना शिवीगाळ करत धमकी दिली, खुर्च्या तोडल्या; दवर्ली प्रकरणातील संशयिताची अटक टाळण्यासाठी धावाधाव

Dovorlim Sarpanch Threat: संशयित वरक यांच्याविरुद्ध मायणा - कुडतरी पोलिसांनी भान्यासं कलम ३३२ (क), ३२४ (३) व ३५२ नुसार गुन्हा नोंद केला आहे.

Sameer Panditrao

मडगाव: दवर्ली-दिकरपालच्या सरपंचांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या दिकरपाल-दवर्ली येथील वल्लभ वरक यांनी अटक होऊ नये, म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या या अर्जावर निकाल होण्याची शक्यता आहे.

संशयित वरक यांच्याविरुद्ध मायणा - कुडतरी पोलिसांनी भान्यासं कलम ३३२ (क), ३२४ (३) व ३५२ नुसार गुन्हा नोंद केला आहे. दक्षिण गोव्याच्या पोलिस मुख्यालयाने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच श्‍याम राजाध्यक्ष यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची माहिती दक्षिण गोव्याच्या पोलिस मुख्यालयाने दिली होती.

याप्रकरणी पंचायत सचिव खुशालीदास गावकर यांनी मायणा - कुडतरी पोलिस स्थानकात वरक यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. वरक यांनी मडगावच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. या अर्जावर मुख्य सत्र न्यायाधीश शॅरीन पॉल यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे ॲड. जे. ठक्कर यांनी काम पाहिले. शुक्रवार, २३ मे रोजी या अर्जावर निर्णय होणार आहे.

खुर्च्यांचे नुकसान

१४ मे रोजी सकाळी ११.१५ वाजता दवर्ली पंचायत कार्यालयात संशयित वल्लभ वरक आले. त्यांनी कार्यालयातील खुर्च्या आणि इतर वस्तूंची हानी केली, असा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

Raksha Bandhan Wishes in Marathi: राखीच्या धाग्यात गुंफलेलं मायेचं नातं... रक्षाबंधननिमित्त भावा-बहिणीच्या नात्यातील जिव्हाळा वाढवणारे 'या' खास शुभेच्छा संदेश

India-America Relations: 'भारतासोबतचे संबंध खराब करु नका...'! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ नितीवरुन अमेरिकन खासदाराने फटकारले

Raksha Bandhan: 'या' देवांना राखी बांधा, संकटाना दूर पळवा! जाणून घ्या रक्षाबंधनाचे महत्व

SCROLL FOR NEXT