Valentine Day Special  Dainik Gomantak
गोवा

Valentine Day 2026: 'हमने तो जब कलियाँ माँगी, काँटों का हार मिला'! व्हॅलेंटाईन डेचा उत्साह, गुलाबांवर मात्र संक्रांत

Valentine Day Rose Story: एकाबाजुने ''व्हॅलेंटाईन डे''चा उत्साह असतानाही ''व्हॅलेंटाईन''चे प्रतीक असलेले गुलाबांवर मात्र संक्रांत आली आहे. 'व्हेलेंटाईन डे' असतानाही गुलाबांच्या मागणीत घट दिसून येते.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' अर्थातच प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगुलांसह ज्येष्ठ दांपत्येदेखील एकमेकांवर प्रेम व्यक्त करून या दिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात. एकाबाजुने ''व्हॅलेंटाईन डे''चा उत्साह असतानाही ''व्हॅलेंटाईन''चे प्रतीक असलेले गुलाबांवर मात्र संक्रांत आली आहे. 'व्हेलेंटाईन डे' असतानाही गुलाबांच्या मागणीत मोठी घट दिसून येते.

सोशल मिडिया आणि अन्य माध्यमातून प्रेम व्यक्त करण्याचे प्रमाण वाढल्याने गुलाबांना मागणी घटली आहे, असे डिचोली बाजारातील फूल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. एक काळ असा होता की, 'व्हॅलेंटाईन डे' म्हटला की, डिचोलीचा फूल बाजार ''व्हेलेंटाईन डे''च्या पुर्वदिनीच गुलाबाच्या फुलांनी खुलून जात असे.

गुलाबांना प्रचंड मागणी असायची. पुर्वदिनीच बाजारातून गुलाब गायब होत असे, मात्र 'कोविड' महामारीनंतर गुलाबांच्या मागणीवर हळूहळू परिणाम होत गेला. ''कोविड''महामारी संपुष्टात आली, मात्र गुलाबांच्या मागणीत झालेली घट आजही कायम आहे, असे फूल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 'व्हेलेंटाईन डे'च्या पुर्वदिनी सायंकाळपर्यंत डिचोलीच्या बाजारात गुलाब फुलांना मोठी मागणी दिसून आली नाही.

समाज माध्यमांचा परिणाम

'कोविड' महामारीनंतर 'व्हेलेंटाईन डे'ला गुलाबांची मागणी कमी झाली आहे. त्यात आजच्या डिजिटल जमान्यात समाज माध्यमाद्वारे प्रेम व्यक्त करण्याचे साधन हातात असल्याने गुलाब विकत घेउन प्रेम व्यक्त करण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. पूर्वी बाजारात गुलाबांचा खच पडायचा. मात्र आता गुलाबांना मागणी नसल्याने विक्रेतेही कमी फुले मावतात, असे रूपा आणि राजेंद्र मयेकर या फूलविक्रेत्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT