Sameer Amunekar
गोवा हे केवळ पार्टी आणि बीचेससाठीच प्रसिद्ध नाही, तर येथे अनेक रोमँटिक ठिकाणे देखील आहेत, जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुंदर क्षण घालवू शकता.
सुंदर सूर्यास्त, शांत निळे पाणी आणि रोमँटिक वातावरण यामुळे हे ठिकाण कपल्ससाठी परफेक्ट आहे.
शापोरा किल्ला हा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. 'दिल चाहता है' चित्रपटातील आयकॉनिक सीन इथेच शूट झाला असल्याने हे ठिकाण कपल्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
दोना पावला हे गोव्यातील सर्वात रोमँटिक आणि ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. कपल्स आणि फोटोग्राफी प्रेमींमध्ये हे ठिकाण लोकप्रिय आहे.
काबो दी रामा हे गोव्याच्या दक्षिण भागातील एक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. येथील रोमँटिक वातावरणमुळे हे ठिकाण कपल्ससाठी खास आकर्षण ठरते.
व्हॅलेंटाईन डे हा दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि तो प्रेम, आपुलकी आणि खास नात्यांचा उत्सव आहे. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खास असतो.