Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa Theft News: तक्रारदार नीलेश प्रभाकर आरोंडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ते आणि त्यांची पत्नी नोकरी व व्यवसायानिमित्त घराबाहेर गेले होते.

Sameer Panditrao

पेडणे: वळपे-विर्नोडा येथील नीलेश प्रभाकर आरोंदेकर यांच्या राहत्या घरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची नोंद पेडणे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

तक्रारदार नीलेश प्रभाकर आरोंडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ते आणि त्यांची पत्नी नोकरी व व्यवसायानिमित्त घराबाहेर गेले होते, तर त्यांचा मुलगा कॉलेजसाठी निघाला होता. दुपारी कॉलेजवरून परतल्यावर मुलाला घराचा दरवाजा उघडा दिसला. त्याने तत्काळ आई-वडिलांना फोन करून याची माहिती दिली.

यानंतर आरोंडेकर दाम्पत्य घरी परत आले असता, घरातील कपाटे अस्ताव्यस्त अवस्थेत दिसली. तपासणी केली असता कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या, कानातील डूल, गळ्यातील साखळी असे एकूण सुमारे सात लाख रुपयांचे दागिने तसेच एक लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

चोरट्यांनी नेमकी कोणत्या मार्गाने घरात प्रवेश केला आणि चोरीसाठी कोणती साधने वापरली याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पेडणे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून शेजारच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी सुरू आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT