Vishwajeet Rane Dainik Gomnatak
गोवा

‘वाघेरी’ पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जाहीर

विश्‍वजीत राणे: बेकायदेशीर जंगलतोड रोखल्यानंतर मोठा निर्णय

दैनिक गोमन्तक

पणजी: वन संरक्षण कायद्याची पायमल्ली करून वाघेरीवर चालू असलेला जंगलाचा विद्‌ध्वंस रोखल्यानंतर वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी तो संपूर्ण विभाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘पर्यावरणीय दृष्टिकोनातून इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून वाघेरीला मान्यता मिळणे महत्त्वाचे आहे. उद्योगाला चालना देण्याच्या नावाखाली तेथे सुरू असलेली अनागोंदी मी थांबवली आणि आता काही अधिकाऱ्यांवरही कारवाई करून अशा गोष्टींना संपूर्णत: पायबंदी घातली जाईल’, अशी माहिती विश्‍वजीत राणे यांनी आज ‘गोमन्तक’ला दिली.

‘वाघेरीवर आम्हाला कोणतेही बांधकाम नको आहे. ज्यांनी नियम तोडले त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. मी नगरनियोजन खात्याच्या सदस्य सचिवाला यापूर्वीच सूचना दिल्या आहेत व 17 (ए) व 17 (बी) या कलमांखाली कायद्याची जी पायमल्ली करण्यात आली त्याविरोधात कडक कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलण्यात आली आहेत. मी मुख्य सचिवांनाही याबाबत पूर्ण कल्पना दिली आहे.

राज्यामध्ये उद्योगधंद्याला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून काही अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने बेकायदा कारवाया चालवलेल्या आहेत. कायद्यांची ही पायमल्ली कोणत्याही प्रकारे आम्ही खपवून घेणार नाही,’ असे विश्‍वजीत राणे यांनी निक्षून सांगितले. वनमंत्री पुढे म्हणाले, वाघेरीवरील अवैध बांधकामांची माहिती मिळताच कारवाई करण्यापूर्वी मी आठवडाभर विचार केला. ज्या पद्धतीने वनसंपत्तीचा विद्‌ध्वंस करून बांधकामे करण्याची योजना बनवली जात आहे तिचा आढावा घेतला असता मला अशा दिशेने जायचे नाही, हे मी पक्के ठरवले आणि त्यानंतरच वाघेरी तसेच हडफडे येथील बेकायदा जंगलतोड व डोंगर सपाटीकरणाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असे ते म्हणाले.

..तर तो गंभीर प्रकार

विश्‍वजीत राणे म्हणाले, वाघेरीवर माझ्याही कुटुंबीयांची जमीन आहे. परंतु असा विद्‌ध्वंस करून तेथे जमिन विकसित करण्याचा आमचा कोणताही मानस नाही. मला विश्‍वासात न घेता तसेच वन खात्याच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनाही न कळवता उद्योग विकासाच्या नावाखाली सत्तरीरील स्थानिक अधिकारी जर असा प्रकार चालवत असतील तर तो गंभीर आहे.

दबावाला भीक घालणार नाही

कडक निर्णय घेण्यापूर्वी मी आमच्या नेतृत्वाशीही चर्चा करून हिरवा कंदिल मिळवला. मी अडचणींबाबत राज्य तसेच केंद्रीय नेत्यांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेतो, असे सांगून राणे म्हणाले, केंद्रीय नेत्यांनीसुद्धा माझ्या या धडाडीचे कौतुक केले आणि मला पूर्ण पाठिंबा दिला आहे. मी कोणत्याही दबावाला आता भीक घालणार नाही असा सूचक इशारा त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

SCROLL FOR NEXT