परदेशी नागरिकांसाठी पणजीत लसीकरण Dainik Gomantak
गोवा

ओळखपत्र नसलेल्या भारतीय, नेपाळी, परदेशी नागरिकांसाठी पणजीत लसीकरण

पणजी येथील डॉन बॉस्को सभागृहात उद्या सकाळी 9 वाजल्यापासून लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) ज्या नागरिकांकडे ओळखपत्र नाही असे भारतीय (India), तसेच नेपाळी (Nepal) व परदेशातील इतर नागरिक यांना लस देण्यासाठी पणजीत (Panajim) पुन्हा एकदा खास लसीकरण (Vaccination) शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यापूर्वी पणजी, मडगाव व आसगाव येथे वरील विभागातील नागरिकांना लस देण्यासाठी शिबिरे घेण्यात आली होती. (Vaccination camp in Panaji for foreign people)

पणजी येथील डॉन बॉस्को सभागृहात उद्या म्हणजेच 7 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ज्यांना पहिला डोस घेऊन 90 दिवस झाले आहेत, त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे, तर ज्यांनी पहिला डोस घेतलेला नाही, त्यांना पहिला डोस मोफत दिला जाणार आहे. देशातील एकही नागरिक लसीशिवाय राहू नये या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार हे लसीकरण होणार आहे. दरम्यान, या शिबिरा व्यतिरीक्त त्याच परिसरात गोमंतकीय नागरिकांनासुध्दा लसीकरण होणार आहे.

डेल्टा’चे अस्तित्व 135 देशांमध्ये

कोरोना विषाणूच्या सर्वाधिक संसर्गक्षम असलेल्या डेल्टा या प्रकाराचा प्रभाव आता 135 देशांमध्ये दिसून येत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे. तसेच, जगभरातील बाधितांची एकूण संख्या पुढील आठवड्यापर्यंत वीस कोटी पर्यंत पोहोचेल, असा इशाराही दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT