Drowning Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar: आंघोळीसाठी नदीत उतरला अन् अचानक गायब झाला; उत्तराखंडचा तरुण दूधसागरमध्ये बुडाला

Dudhsagar Goa Drowning: विक्रांतचा त्याच्या मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचा शोध लागला नाही.

Pramod Yadav

फोंडा: दूधसागर नदीत उत्तराखंड येथील तरुण बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी आले असता तरुण पाण्यात उतरला आणि अचानक गायब झाला.रविवारी (१६ फेब्रुवारी) ओकांब-धारबांदोडा येथे ही घटना घडली.

विक्रांत रावत (वय २५, रा.तिस्क- उसगाव, मूळ उत्तराखंड) असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी सुट्टी असल्याचे विक्रांत त्याच्या मित्रांसोबत ओकांब-धारबांदोडा येथे दूधसागर नदीत आंघोळीसाठी गेला होता. विक्रांत पोहण्यासाठी पाण्यात उतरला खरा पण अचानक तो गायब झाला.

विक्रांतचा त्याच्या मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचा शोध लागला नाही. अग्निशामक दलाने शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडू शकला नाही. रविवारी रात्री शोधकार्य थांबवल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा शोध सुरु केल्यानंतर अखेर दुपारी रावतचा मृतदेह आढळून आला आहे.

अग्नीशामक दल व फोंडा पोलीस विक्रांतचा शोध घेत होते.उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथे हॉस्पिसियोत पाठविला आहे. पुढील तपास फोंडा पोलीस करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT