Goa Election: Utpal Parrikar

 
Dainik Gomantak
गोवा

आता मागे वळून पाहणार नाही : उत्पल पर्रीकर

पणजीतून निवडणूक लढविण्याचा निर्धार; भाजपासमोर नवा पेच

आदित्य जोशी

पणजी : पणजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. शिवाय ट्विटरवर 'आता मागे वळून पाहणार नाही' असे ट्वीट केले आहे. त्यामुळे उमेदवारी मिळो अथवा न मिळो, पणजीतून निवडणूक लढवणारच असा ठाम निश्चिय जाहीर केल्याने भाजपसमोरचा पेच वाढला आहे.

पणजी हा मनोहर पर्रीकर यांचा बालेकिल्ला. ते 1994 पासून 2019 पर्यंत केंद्रीय मंत्रिपदाचा अपवाद वगळता या मतदारसंघाचे प्रतिनिधी होते. त्यांच्यानंतर या मतदारसंघांत 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बाबुश मोन्सेरात (Babush Monserratte) हे भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळकर यांचा पराभव करून काँग्रेसकडून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे भाजपमधील स्थान मोठे होते. त्यांच्या पश्चात ही जागा त्यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल पर्रीकर लढवतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावेळी भाजपने त्यांना थांबण्याचा सल्ला दिल्याने ते निवडणूक लढवू शकली नव्हते. यंदा या जागेवर विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांनी दावा केला आहे आणि पक्षाने तो मान्य केला आहे. यानुसार 2022 च्या विधानसभा निवडणुकीत बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे. अद्यापही त्यांना पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र, उत्पल पर्रीकर यांनी आपण निवडणूक लढवणारच यावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यामुळे भाजपसमोर (BJP) पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT