Goa BJP, UTAA Controversy Dainik Gomantak
गोवा

UTAA Controversy: 'वेळीप यांचे दर निवडणुकीत पक्षविरोधी काम', भाजपचे प्रत्त्युत्तर; आदिवासी नेत्यांनी साथ सोडल्याचा दावा

Goa BJP: भाजपच्या येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नेत्यांनी त्याही पुढे जात वेळीप यांनीच दर निवडणुकीत भाजपविरोधी उमेदवाराचे काम केल्याचा आरोप करत त्यांची पोलखोल केली.

Sameer Panditrao

पणजी: आदिवासी समाज आपल्यासोबत असल्याचा दावा करून सत्ताधारी भाजपला धमकावणाऱ्या प्रकाश शंकर वेळीप यांना अखेर आज भाजपने त्यांची जागा दाखवली. वेळीप यांच्यासोबत आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधीही नसल्याचे भाजपने आज सिद्ध केले.

भाजपच्या येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नेत्यांनी त्याही पुढे जात वेळीप यांनीच दर निवडणुकीत भाजपविरोधी उमेदवाराचे काम केल्याचा आरोप करत त्यांची पोलखोल केली. दोन दिवसांपूर्वी वेळीप यांनी गोमंतक गौड मराठा समाज आणि उटा या संघटनांवरील बंदी न उठवल्यास आदिवासी समाज येत्या निवडणुकीत भाजपला धडा शिकवेल, असा इशारा दिला होता.

भाजपचे दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर म्हणाले, सताना कधीच भाजपला मतदान केलेले नाही. संघटनेवर भाजप किंवा सरकारने नव्हे, तर न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे वेळीप हे खोटे बोलत आहेत हे सिद्ध आहे. आदेश मान्य नसल्यास त्याविरोधात दाद मागता येते. २००४ साली ‘उटा’ स्थापन झाली, तेव्हापासून आम्ही माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, सभापती रमेश तवडकर, स्व. काशिनाथ जल्मी, आमदार गणेश गावकर आदींनी उटा संघटनेसाठी काम केले आहे. वेळीप यांनी ही एकट्याची संघटना समजू नये.

यावेळी दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, सुरेश केपेकर, खुशाली वेळीप, शाणू वेळीप, अनुसूचित जाती-जमाती महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर, आदिवासी मोर्चाचे उपाध्यक्ष ॲॅन्थनी बार्बोझा आदी उपस्थित होते.

वेळीपांवर विश्‍वास ठेवू नका!

प्रेरणा दिनावेळी दिले जाणारे पुरस्कार ‘उटा’ नव्हे, तर आदिवासी कल्याण खाते देते. ‘उटा’ ही १४ जणांची संघटना, हेच धक्कादायक आहे. ‘उटा’चे आजवरचे सचिव उदय गावकर आहेत. त्यांनी ‘उटा’ संघर्ष पुस्तकात संघटनेचा इतिहास मांडला आहे. त्याच्याशी वेळीप असहमती का दर्शवत आहेत. ‘उटा’नेच पुस्तक प्रकाशनासाठी आर्थिक मदत दिली. त्यामुळे वेळीप यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे गावकर म्हणाले.

पद मिळविण्यासाठी बदलले वारंवार रंग

भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर केवळ पद मिळवण्यासाठी वेळीप यांनी वारंवार रंग बदलल्याचा आरोप करून प्रभाकर गावकर म्हणाले, वेळीप सहकार पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी ‘सहकाररत्न’ पुरस्कार स्वतःच्या पदरात पाडून घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT