Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime: उसगावच्या ग्रामसचिवाचा प्रताप; युवतीला पाठवले अश्लील मेसेज, विनयभंगाची तक्रार दाखल

Ponda Usgao Crime: २ ऑक्टोबर २०२४ रोजी ही युवती उसगाव पंचायतीत कंत्राटी तत्त्वावर फिल्ड सर्व्हेअर म्हणून रूजू झाली होती.

Sameer Panditrao

Ponda molestation case

फोंडा: उसगाव ग्रामपंचायतीचे सचिव होनाजी अनिल मोरजकर (वय ५५ वर्षे) याच्याविरुद्ध एका युवतीने विनयभंगाची तक्रार फोंडा पोलिसांत आज (मंगळवारी) दाखल केली. सत्तरी भागातील ही युवती सर्व्हेअर म्हणून कंत्राटी तत्त्वावर उसगाव पंचायतीत कामाला होती.

मात्र, कामाच्या निमित्ताने सचिवाने विनयभंग केल्याची तक्रार या युवतीने केली आहे. उसगाव - गांजेच्या पंचसदस्य मनीषा उसगावकर यांच्या सहकार्याने पीडित युवतीने ही तक्रार दाखल केली असून त्यात पंचायत सचिवाने या युवतीच्या मोबाईलवर पाठविलेले मेसेजही जोडले आहेत.

२ ऑक्टोबर २०२४ रोजी ही युवती उसगाव पंचायतीत कंत्राटी तत्त्वावर फिल्ड सर्व्हेअर म्हणून रूजू झाली होती. संबंधित सचिवाने तिला २४ हजार रुपये वेतन दिला जाईल, असे सांगितले होते. मात्र, धनादेशाद्वारे मिळणाऱ्या या वेतनातून ९ हजार रुपये रोख स्वरूपात पंचायत सचिवांकडे परत करण्यास सांगण्यात आल्याने प्रत्येक महिन्याला ९ हजार रुपये परत केले जायचे.

१५ ऑक्टोबरला या युवतीला फिल्ड सर्व्हेअरचे काम बंद करून कार्यालयीन कामासाठी बोलावले. त्याचा फायदा घेत पंचायत सचिव होनाजी मोरजकर याने मोबाईलवर अश्‍लिल मेसेज पाठवायला सुरुवात केली, तसेच विनयभंग केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या युवतीने काम सोडले असून फोंडा पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT