Divya Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: वाळपई बालभवन केंद्राच्या नूतनीकरण आणि विस्ताराची नितांत गरज; डाॅ. दिव्या राणे

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: साठ वर्षांहून अधिक काळ समाजाचा आधारस्तंभ असलेल्या वाळपई येथील बालभवन केंद्राची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे. यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी समर्पित असलेली ही अत्यावश्यक सुविधा आता अपुरी पडत असून या केंद्राचे नूतनीकरण आणि विस्ताराची नितांत गरज असल्याची मागणी पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी विधानसभेत केली.

शनिवार, ३ रोजी ‘दै. गोमन्तक’मध्ये यासंबंधीची बातमी प्रसिद्ध होताच. पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी यासंबंधीची सविस्तर माहिती जाणून घेऊन आज विधानसभेत हा प्रश्न मांडला, त्यामुळे वाळपईच्या भागातून सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांना यासंबंधीची विनंती करताना वाळपई येथील बालभवन केंद्राची पुनर्बांधणी व विस्तारीकरणासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी आमदारांकडून करण्यात आली.

‘बालभवन’बाबत लवकरच निर्णय

मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना या बालभवनची इमारत ही शिक्षण खात्यात येत असून यासंबंधी आपण लवकरच ठोस पाऊल उचलून संबंधित खात्याबरोबर चर्चा करीन. इमारतीचे दुरुस्ती काम किंवा पुनर्बांधणीसंबंधी निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. तत्पूर्वी इमारतीची तातडीने दुरुस्ती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे'; गुजरातमधील परिषदेत मुख्‍यमंत्री सावंतांचे आवाहन

Cutbona Jetty: कुटबण- मोबोर येथे आणखी ४ कॉलराबाधित सापडले! 'संख्‍या १८७' वर

St Estevam Accident: बाशुदेव कडे होते रोख '१ लाख' रुपये? २३ सप्टेंबरनंतरच ‘ती’ जबाब द्यायला गोव्यात येणार

Goa Cabinet Reshuffle: पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राच्या निवडणुकीत गर्क; गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना पुन्हा लांबणीवर

Goa Accidents: गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच! आणखी तीन बळी; मांद्रेतील तिसऱ्या तरुणीचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT