UPs delivery boy death on spot in accident at Bhoma in Goa Dainik Gomantak
गोवा

UPच्या डिलिव्हरी बॉयचा गोव्यात झालेल्या अपघातात जागीच मृत्यू

सुनील गुप्ता हा सकाळी वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता.

दैनिक गोमन्तक

मडकई: फोंडा - पणजी महामार्गावरील काळी माती - भोम येथे काल दुचाकी अपघातात दुचाकीस्वार सुनील विजय गुप्ता (वय 22) या तरूणाचा मृत्यू झाला. सुनील हा मूळ उत्तर प्रदेश येथील असून तो एका खासगी कंपनीत ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करीत होता. सुनील गुप्ता हा आपल्या कुटुंबासमवेत दासोळवाडा - कुंडई येथे एका भाड्याच्या घरात राहत होता. सुनील गुप्ता हा सकाळी वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता.

दुपारी घरी परतताना काळी माती - भोम येथे अज्ञात वाहनाची त्याच्या जीए-05 - एन - 5578 या क्रमांकाच्या दुचाकीला ठोकर बसली. या ठोकरीनिशी तो जमिनीवर फेकला गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला. ठोकर दिलेल्या अज्ञात वाहनचालकाने वाहनासह पळ काढल्याचा कयास व्यक्त करण्यात येत असून पोलिस या वाहनाच्या शोधात आहेत.

सुनील गुप्ता हा युवक आई, वडील, बहिणीसमवेत कुंडईत राहत होता. हल्लीच त्याच्या बहिणीचे उत्तर प्रदेश येथे लग्न करून देण्यात आले होते. त्याची आई सध्या मुलीकडे असून सध्या सुनील वडिलासमवेत कुंडईत राहत होता. फोंडा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी इस्पितळात पाठवला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT