Kidnapping | Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : वडिलांच्या अपघाताचा बनाव; म्हापशात शाळेमधून विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न?

तुझ्या वडिलांचा अपघात झाला असून मला तुझ्या आईनेच तुला नेण्यासाठी पाठविले आहे, असे त्या बुरखाधारी महिलेने मुलीस सांगितल्याचा दावा लेखी तक्रारीत आईने केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : शहरातील एका नामांकित शाळेतून आपल्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करत पीडितेच्या आईने म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी अज्ञात बुरखाधारी महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता.

उपलब्ध माहितीनुसार, हा प्रकार गुरुवारी (ता.29) दुपारी शाळेच्या आवारात घडला. अज्ञात बुरखाधारी महिलेने शाळेत प्रवेश केला. तुझ्या वडिलांचा अपघात झाला असून मला तुझ्या आईनेच तुला नेण्यासाठी पाठविले आहे, असे त्या बुरखाधारी महिलेने मुलीस सांगितल्याचा दावा लेखी तक्रारीत आईने केला आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांकडे चौकशी केली असता एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे. आम्ही मुलीच्या आई-वडिलांकडून याविषयी माहिती घेतली आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले. मात्र, काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. आवश्यकतेनुसार शाळेलगतच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जाईल.

मुख्यमंत्री म्हणतात सत्य उजेडात आणा

दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. म्हापशात जो प्रकार झाला आहे तो गंभीर आहे. याप्रकरणातील सत्य समोर आणण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना केलं आहे.

सध्या राज्यात मुलांना पळवून नेणारी कथित टोळी सक्रिय झाल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, पोलिसांनी असा एकही प्रकार राज्यात घडला नसून तशी नोंदही नसल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त

हा प्रकार घडला, त्यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नव्हता. मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त आहेत. त्यामुळे ती बुरखाधारी महिला कोण, हे समजू शकले नाही. सध्या शाळकरी मुले असुरक्षित असल्याचा आरोप त्यांनी केला.

अन् ‘ती’ महिला बिथरली

ती महिला आपल्यासोबत येण्याचा आग्रह करत असता, माझ्या मुलीने या महिलेला ‘फॅमिली कोड’ विचारला. तेव्हा ती महिला गोंधळली. हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे, हे लक्षात येताच माझी मुलगी घाबरली आणि पळत माघारी फिरली. व्हायोलिन शिक्षकांकडे जाऊन तिने हा प्रकार कथन केला, असे पीडित मुलीची आई म्हणाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT