Bicholim News Dainik Gomantak
गोवा

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

गोमन्तक डिजिटल टीम

‘भू-सर्व्हेक्षण’वरून डिचोली तालुक्यातील म्हावळींगे गावात आज (बुधवारी) काहीसा तणाव निर्माण झाला. गावातील गुपचूपपणे सुरू असलेले सर्व्हेक्षण काम संतप्त लोकांनी रोखून धरले. इतकेच नव्हे, तर सर्व्हे करणारे तिन्ही संशयित काहीच माहिती देत नसल्याने संतप्त लोकांनी या युवकांना घेरून ठेवले.

डिचोली पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी म्हावळींगे गावात जाऊन संशयित युवकांची लोकांच्या तावडीतून सुटका करून ताब्यात घेतले. सर्व्हे करण्यासाठी आलेले हे युवक फोंडा येथील आहेत, अशी माहिती मिळाली आहे. मात्र ते कोणाच्या सांगण्यावरून जमिनीचे सर्व्हेक्षण करीत होते, ते मात्र स्पष्ट झाले नाही.

कुडचिरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने एका जमिनीचे आज सर्व्हेक्षण काम चालू होते. गावकऱ्यांना या प्रकाराची माहिती मिळताच, सर्व्हेक्षण काम चालू असलेल्या ठिकाणी गावकऱ्यांनी धडक दिली.

सर्व्हे करणाऱ्या तिघांही युवकांना गावकऱ्यांनी प्रश्न केला असता, ते युवक निशब्द राहिले. त्यामुळे लोक संतप्त झाले. त्यांनी सर्व्हेक्षणाचे काम रोखून धरतानाच, ‘त्या’ तिन्ही संशयित युवकांना श्री सातेरी देवीच्या मंदिरात आणून बसविले. तासाभरानंतर पोलिस त्याठिकाणी आले.

पोलिसांनी गावकऱ्यांशी चर्चा करुन पोलिस स्थानकात येऊन तक्रार द्या, असे गावकऱ्यांना सांगून तिघांही संशयितांना ताब्यात घेतले. आमच्या गावात जर कोणीही बेकायदेशीरपणे घुसून चोरट्यामार्गाने भू-सर्व्हेक्षण करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गप्प राहणार नाही, असा इशारा म्हावळींगेच्या लोकांनी दिला आहे.

आम्हाला आमच्या जमिनी हव्यात

म्हावळींगे हा गाव मोकासदारीच्या विळख्यात अडकलेला आहे. जमिनी ताब्यात मिळाव्यात म्हणून लोकांचा अजूनही संघर्ष चालू आहे. आमच्या जमिनी आम्हांला मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही गावात बेकायदेशीरपणे भू-सर्व्हेक्षण करू देणार नाही.

तसा प्रयत्न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशारा देवस्थानचे अध्यक्ष शशिकांत गावकर आणि माजी पंचसदस्य शिवा गावकर यांनी दिला आहे.

तर आमच्या जमिनी आम्हाला मिळायलाच पाहिजे, अशी मागणी माजी सरपंच मधू नाईक गावकर यांनी करुन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT