Nitin Gadkari | New Zuari Bridge  Dainik Gomantak
गोवा

Nitin Gadkari: डिसेंबरमध्ये नितीन गडकरी करणार झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन?

तीन दिवस विश्रांतीसाठी येणार असल्याची चर्चा

Akshay Nirmale

Goa New Zuari Bridge: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये तीन दिवस गोव्याच्या दौऱ्यावर असल्याचे समजते.

तथापि, त्यांचा हा दौरा राजकीय नसणार आहे. तर विश्रांतीसाठी वैयक्तिक स्वरूपाचा हा दौरा असल्याचे समजते.

दरम्यान, गतवर्षी गडकरींच्या उपस्थितीत गोव्यातील नवीन झुआरी पुलाचे उद्घाटन झाले होते. तथापि, अद्याप या पुलाच्या दुसऱ्या लेनचे काम झालेले नाही. ते सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.

या आधी या कामाच्या कंत्राटदारांकडून दिवाळीपुर्वी दुसऱ्या लेनचे काम संपवले जाईल, असे सांगण्यात आले होते.

त्यानंतर 25 डिसेंबरपुर्वी हे काम पूर्ण होईल, असे सांगितले गेले. अद्याप काम सुरू आहे. डिसेंबर महिन्यात हे काम पूर्ण होऊ शकते.

त्यामुळे या कामाची पूर्तता आणि विश्रांतीसाठी का असेना पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दौरा यावरून गडकरी यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये या पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन होऊ शकते, असा कयास लावला जात आहे.

नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या चौपदरी विभागाचे काम प्रगत टप्प्यात आहे. पुलाच्या दुसऱ्या विभागाचा बंद भाग बसवला गेला आहे.

बहुप्रतिक्षित नवीन झुआरी केबल स्टेड पुलाची दुसरी लेन त्यामुळे डिसेंबरमध्ये खुली होऊ शकेल. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने तसेच सोसाट्याचा वारा असल्याने हे काम थांबले होते.

त्यामुळे या कामाला विलंब लागल्याची माहिती, दिलीप बिल्डकॉन स्ट्रक्चरचे उपाध्यक्ष अतुल जोशी यांनी यापुर्वी दिली होती.

तेव्हा जोशी यांनी पुलाच्या चार सेगमेंट लिफ्टिंगचे काम सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल आणि दुसऱ्या लेन केबल स्टेड ब्रिजचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होईल, 97 टक्के काम पूर्ण आहे, असे त्यांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anjuna Gramsabha: हणजूण मारहाण प्रकरण चिघळले; दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल!

Pilgao Mining Protest: पिळगावचे वातावरण तापले; आंदोलनात महिलांची उडी, तिसऱ्या खनिज वाहतूक बंदच

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

Sattari Water Scarcity: सत्तरी तालुका लवकरच टँकरमुक्त, १.५७ कोटी रुपयांची योजना; आमदारांनी सांगितला पुढच्या दोन वर्षांचा प्लान

Goa Live News: बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT