Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport to Shut or Not : मोपा सुरु झाल्यास दाबोळीचं विमानतळ बंद होणार का? केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

दाबोळी सुरु राहीलं तरी त्यावर आंतरराष्ट्रीय विमानं उतरणार की फक्त देशी विमानंच उतरणार अशीही चर्चा सध्या सुरु आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Dabolim Airport to Shut or Not : गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेलं उत्तर गोव्यातील नवं मोपा ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मात्र यासोबतच गेल्या काही दिवसांपासून गोव्यात एका नव्या वादाला तोंड फुटलंय. ते म्हणजे मोपा सुरु झाल्यावर सध्याच्या दाबोळी विमानतळाचं काय होणार? दक्षिण गोव्यातील व्यावसायिकांनी दाबोळी विमानतळ बंद करण्यास तीव्र विरोध केला आहे. सरकारनेही हे विमानतळ कार्यान्वित राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. इतकं असूनही दाबोळीबाबतच्या चर्चा काही थांबलेल्या नाहीत. आता केंद्रीय नागरी उड्डयण राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी या वादावर पूर्णविराम देत स्पष्टीकरण दिलं आहे.

गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केंद्रीय नागरी उड्डयण राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये दाबोळी विमानतळ प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी गोव्यातील नवीन होऊ घातलेलं मोपा ग्रीनफील्ड विमानतळ आणि दाबोळी ही दोन्ही विमानतळे एकमेकांच्या समन्वयाने कार्यरत राहतील, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी या दोन्ही विमानतळांमध्ये समन्वय ठेवला जाईल, याबाबत माविन गुदिन्हो आणि खात्री दिली. काही लोक विनाकारण दाबोळी विमानतळ बंद होणार असल्याचं वृत्त पसरवून गोव्यात विनाकारण वाद निर्माण करत आहेत, पण असे काहीही होणार नाही, दाबोळी विमानतळ नियमितपणे सुरू राहील, त्यामुळे दक्षिण गोव्यातील लोकांनी आणि व्यावसायिकांनी कोणतीही काळजी करू नये, असं आवाहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर केलं आहे.

दाबोळीवरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) सुरूच राहणार असल्याच स्पष्ट केले होते. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबत चिंता व्यक्त करत दाबोळीला घोस्ट विमानतळ करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केला होता. दाबोळी विमानतळाबाबत अफवा पसरवू नयेत, दोन्ही विमानतळ कार्यरत राहतील असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले होते. दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनीही दाबोळी सुरुच राहणार असल्याचं म्हटलं होतं.

जुन्या पत्रामुळे समाजमाध्यमांवर चर्चांना उत

दाबोळी विमानतळ देशी विमानांसाठी, तर मोपा आंतरराष्ट्रीय विमानासाठी खुला असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी दिली असली तरी 2000 साली केंद्र सरकारने गोवा सरकारला लिहिलेल्या पत्रात मोपा विमानतळ सुरू झाल्यावर दाबोळी विमानतळ बंद केला जाईल, अशी स्पष्ट सूचना दिलेले पत्र पुन्हा चर्चेत आलं आहे.

फ्रान्सिस सार्दिन हे गोव्याचे मुख्यमंत्री असताना 1 मे 2000 रोजी केंद्राकडून त्यावेळचे राज्याचे मुख्य सचिव अशोक नाथ यांना एक पत्र आले होते. त्यात 29 मार्च 2000 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एकदा मोपा विमानतळ सुरू झालं की, दाबोळी विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. सध्या हे पत्र समाज माध्यमांवर फिरत आहे. त्यामुळे दाबोळी सुरु राहीलं तरी त्यावर आंतरराष्ट्रीय विमानं उतरणार की फक्त देशी विमानंच उतरणार अशीही चर्चा सध्या सुरु आहे.

ओमान एअरलाईन्सचं होणार मोपावर लँडिंग

दरम्यान ओमान एअरलाईन्सने 1 जानेवारीपासून आपली गोव्यात येणारी सर्व विमानं दाबोळीऐवजी मोपा विमानतळावर उतरवणार असल्याची घोषणाच केली आहे. जानेवारीपासून एअरलाईन्स दाबोळीचा उड्डाणांसाठी वापर करणार नसून प्रवाशांच्या माहितीसाठी ओमान एअरलाईन्सने ही माहिती जाहीर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT