Covid Update: Union Health Minister convenes meeting of all states

 

Dainik Gomantak

गोवा

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतली सर्व राज्यांची बैठक; गोव्यातर्फे 'ही' मागणी

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांची आढावा बैठक घेतली. कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रतिसाद आणि लसीकरण (Vaccination) योजनेचे पुनरावलोकन करण्यासाठी ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Covid Update: गोव्यात नवीन वर्षाच्या स्वागतानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. दरवर्षी गोव्यात नवीन वर्षासाठी (New Year) देशातील आणि परदेशातील लाखों पर्यटक येत असतात. कोरोनाकाळात गेल्यावर्षी याच महिन्यात रुग्णसंख्या वाढली होती. आणि आताही हेच चित्र दिसत आहे.

यातच आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr. Mansukh Mandaviya) यांनी सर्व राज्यांची आढावा बैठक घेतली. कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रतिसाद आणि लसीकरण (Vaccination) योजनेचे पुनरावलोकन करण्यासाठी ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आभासी पद्धतीने (Virtual Meeting) hiही बैठक पार पडली. गोव्याचे आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणेही ह्या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये ओमिक्रॉन (Omicron) संदर्भात नियमावली जारी करण्याची तसेच कोविड-19 चाचणीसाठी (Corona Test) जिनॉम सिक्वेन्सिंग मशीन देण्याची मागणी गोव्यातर्फे करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT