Girl Death Dainik Gomantak
गोवा

Girl Death: म्हापश्यात साडेतीन वर्षीय मुलीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

म्हापसा- करासवाडा येथे सोमवारी सायंकाळी विहिरीत पडलेल्या तीन वर्षीय मुलीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा- करासवाडा येथे सोमवारी सायंकाळी विहिरीत पडलेल्या तीन वर्षीय मुलीला म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले. तिला  वाचवल्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार करून 108 रुग्णवाहिकेद्वारे म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, सायंकाळी उशिरा या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

याबाबत माहिती अशी की, ही मुलगी इतर काही मुलांसोबत खेळत होती. खेळताना बॉल विहिरीवरील वायरच्या जाळीवर पडला.तो काढण्यासाठी ती विहिरीवर चढल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या वायरच्या जाळीवरून ती पडली. सायंकाळी 7.35 च्या सुमारास ही घटना घडली.

कॉल मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र अंधारामुळे शोधकार्यात  अडथळा येत होता. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी  अथक प्रयत्नांनी तिला विहिरीतून बाहेर काढले. मात्र, सायंकाळी उशिरा या दुर्दैवी मुलीचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT