Candolim Beach 
गोवा

Candolim: रेड अलर्टमध्ये समुद्रकिनारी मॉर्निंग वॉक जीवावर बेतले; गोव्यात मुंबईचे तिघे बुडाले, दोघांचा मृत्यू

Mumbai Tourist Drowned In Goa: हवामान खात्याने बुधवारपासून गोव्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

Pramod Yadav

मुंबईतून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या तीन पर्यटक कांदोळी येथील समुद्रात बुडल्याची घटना आज (दि.१९ जुलै) सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. दुर्दैवाने यातील दोघांचा मृत्यू झाला असून, एका महिलेवर बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कांदोळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना आज (गुरुवारी) सकाळी तीन पर्यटक समुद्रात बुडाल्याची माहिती मिळाली. यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता. कुटुंबीय आणि मित्रांसोबत तिघेहीजण गोव्यात पर्यटनासाठी आले होते.

घटनास्थळी असलेल्या पर्यटक पोलिस आणि जीवरक्षकांनी तिघांना बाहेर काढून प्राथमिक उपचार दिले व पुढील उपचारासाठी कांदोळी प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. पण, एक महिला व पुरुषाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर, दुसऱ्या एका महिलेला पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोव्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस होत आहे. हवामान खात्याने बुधवारपासून राज्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. स्थानिक तसेच पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या पर्यटकांना रेड अलर्टची जाणिव नसल्याने सकाळी तिघेही कांदोळी समुद्रकिनारी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते.

यावेळी आलेल्या उंच लाटेचा फटका त्यांना बसला व तिघेहीजण समुद्रात वाहून गेले. घटनास्थळी असलेल्या पर्यटक पोलिस आणि जीवरक्षकांनी तिघांना बाहेर काढले.

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने पुढील पाच दिवस देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, १९ आणि २० जुलै रोजी रेड तर २१ जुलैपासून तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात सुरु असणारे पाणी साचण्याचे प्रकार आणि पडझडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT