Ukrainian citizen found dead in Benaulim Goa Dainik Gomantak
गोवा

युक्रेनियन नागरिकाचा गोव्याच्या बाणावलीत मृत्यू; कारण गुलदस्त्यात

गुरोव डिसेंबर 2021 मध्ये गोव्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी : दक्षिण गोव्यातील बाणावली येथील भाड्याच्या व्हिलामध्ये बुधवारी युक्रेनियन नागरिक दिमिट्रो गुरोव (49) याचा मृतदेह सापडला, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरोव डिसेंबर 2021 मध्ये गोव्यात आला होता. तेव्हापासून तो बाणावली बीचजवळ भाड्याच्या व्हिलामध्ये राहत होता. "त्याची मैत्रीण त्याच्यासोबत व्हिलामध्ये राहत होती. तिने परिसरातील स्थानिकांना एकत्र केले आणि त्यानंतर आम्हाला घटनेची माहिती दिली," असे पोलिस निरीक्षक मेलसन कोलाको यांनी सांगितले.

आज किंवा उद्या शवविच्छेदन केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पुढील प्रक्रियेसाठी गोवा पोलिस युक्रेनच्या दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी कोलवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Atal Patrol Ship: खोल समुद्रात स्वदेशी 'अटल' घालणार गस्त! गोवा शिपयार्डतर्फे 6वे द्रुतगती जहाज; आणखी 12 जहाजांचे जलावतरण होणार

Goa Job Scam: 20 लाख घेतात, अमेरिकेत नोकरीचे आश्वासन देतात; गोव्यातील तरुणांची होतेय फसवणूक, आमोणकरांनी मांडली व्यथा

Goa University: ‘चोरीचा अहवाल फुटला कसा?’ विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या बैठकीत 4 तास खल

Goa Politics: खरी कुजबुज; युरीबाबको गुस्सा क्यों आता है?

Goa: गोव्‍यात काम देण्‍याच्‍या बहाण्‍याने युवतींची फसवणूक! महाराष्‍ट्रातील मुलीही विळख्‍यात; नेपाळ, केनिया, युगांडाच्‍या तरुणींना आमिष

SCROLL FOR NEXT