uguem firing latest news Dainik Gomantak
गोवा

Uguem Firing: उगवे गोळीबार प्रकरणात दोघे पोलिस! एकूण 5 जणांना अटक; गुप्तचर यंत्रणेच्या आधारे कारवाई

uguem firing case goa: जैतीर उगवे येथे रेती व्यवसायातून झालेल्या गोळीबार प्रकरणी पेडणे पोलिसांनी तेमवाडा उगवे येथील पाच जणांना अटक केली

Akshata Chhatre

पेडणे, ता. २ (प्रतिनिधी): जैतीर उगवे येथे रेती व्यवसायातून झालेल्या गोळीबार प्रकरणी पेडणे पोलिसांनी तेमवाडा उगवे येथील पाच जणांना शनिवार (दि.१) रात्री उशिरा अटक केली. तांत्रिक देखरेख आणि मानवी गुप्तचर यंत्रणेच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

अटक केलेल्यांमध्ये नेहल नितीन महाले (वय २०), आशिष शिवाजी महाले (वय २४), आकाश अरुण महाले, (वय २४), ऋषिकेश दशरथ महाले (वय ३२), गंगाराम गोपीचंद महाले (वय ३४) यांचा समावेश आहेत. यापैकी ऋषिकेश दशरथ महाले व गंगाराम गोपीचंद महाले हे आयआरची पोलिस आहेत.

७ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास जैतीर उगवे येथे तेरेखोल नदीत एक आठजणांचा गट होडीतून रेती काढत होता. यावेळी नदीच्या किनाऱ्याजवळच्या बागायतीतून या रेती काढणाऱ्यांवर बंद‌कीने गोळीबार झाला होता. या गोळीबारात रमेश पासवान व लालबहादुर गोंड हे दोन मजूर गंभीर जखमी झाले होते.

लालबहादूर गोंड याच्या मानेतून आरपार गोळी गेले होती, तर रमेश पासवान याच्या दंडाला घासून गोळी केली होती. या दोन्ही रेती मजुरावर बांबोळी येथील गोमेकॉत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती आता सुधारली आहे.

या गोळीबारानंतर पोलिसांनी रेती मजूर, रेती व्यावसायिक तसेच शेती बागायती करणारे शेतकरी यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती, तर बेकायदेशीर रेती उत्खनन प्रकरणी दोन रेती व्यावसायिक व पाच मजुरांना अटक केली होती.

तेरेखोल नदीत जैतीर उगवे येथे रेती काढण्यात येत असल्याने नदीचे पात्र रुंद होऊन शेती बागायतीची जमीन नदीच्या पात्रात जात असल्याने अशाप्रकारे बेकायदेशीर रेती काढणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी गेली सुमारे दहा बारा वर्षे उगवे येथील शेतकरी मागणी करत असून यासाठी त्यांनी पेडणे मामलेदार व पेडणे पोलिस स्थानकावर मोर्चेही काढले होते.

न्यायालयाने रेती काढण्यावर बंदी आणल्यानंतरही अधूनमधून कारवाई वगळता किनारी पोलिस, मामलेदार, खाण व उद्योग खाते यांच्याशी तक्रारी करूनही या ठिकाणी बेकायदेशीर रेती उपसा सुरूच आहे, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या, बेकायदेशीर रेती काढणारे व्यावसायिक व शेतकरी यांच्यातील संघर्ष सुरू होता. त्यातून हा गोळीबार झाला असावा असा निष्कर्ष आहे. पेडणे पोलिस पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT