arrest Dainik Gomantak
गोवा

व्हिसाची मुदत संपल्यावरही गोव्यात मुक्काम, युगांडाच्या महिलेला अटक; पोलीस Action Mode मध्ये

संबंधित महिला सध्या हणजुणे येथे वास्तव्यास होती

गोमंतक ऑनलाईन टीम

Foreign woman Arrested: गोवा हे देशी-विदेशी पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे गोव्याकडे येण्याला या पर्यटकांची पहिली पसंती असते. पण काही परदेशी पर्यटक त्यांच्या व्हिसाची मुदत संपली तरी जाण्याचे नाव घेत नाहीत. अशाच एका पर्यटक महिलेला आता हणजुणे पोलिसांनी अटक केली आहे.

ही पर्यटक महिला युगांडा या देशाची रहिवासी आहे. भारतातील व्हिसाचा कालावधी संपुनही अधिक काळ वास्तव्य केल्यावरून तिला अटक करण्यात आली आहे. हणजुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार नॅन्टोंगो लतीफा असे या महिलेचे नाव असून ती 34 वर्षांची आहे. सध्या ती बार्देशातील हणजुणे येथे वास्तव्यास आहे. तिच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली असता कागदपत्रांची मुदत संपल्याची आढळून आली. पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक स्नेहा सावळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly: 'गोव्यात मुलांचे खून होतील, असे वाटले नव्हते'! राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली असल्याचे विरोधकांचे आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; रामदेवबाबांचे कुंकळ्‍ळीतही कारनामे?

Goa Jobs: गोवा सरकारचे आश्वासक पाऊल! खासगी नोकऱ्यांसाठी धोरण आणणार; GHRDC च्या माध्यमातून होणार भरती

Goa Assembly: 'कृषी पर्यटनाला चालना, 7 क्लस्टरची स्थापना होणार'; विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Anjunem Dam: चारही दरवाजे उघडले, अंजुणे धरणातून विसर्ग सुरू; धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT