Uday Madkaikar and Babush Monserrate  Dainik Gomantak
गोवा

Uday Madkaikar : उदय मडकईकर यांचे बाबूश यांच्याशी ‘गुफ्तगू’

नरमाईचे धोरण : पुन्हा सूत जुळण्याचे संकेत; जुनी मैत्री पुन्हा खुलणार

दैनिक गोमन्तक

Uday Madkaikar : विधानसभा निवडणुकीपूर्वी दूरावलेले माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर आणि माजी नगरसेवक दया कारापूरकर यांची आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याबरोबर शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणच्या हॉटेलमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यामुळे या दोघांचे मोन्सेरात यांच्याशी पुन्हा सूत जुळण्याची शक्यता आहे. हा विषय महापालिका वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे. परंतु अशी चर्चा झाली नसल्याचे या तिघांचेही म्हणणे आहे.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ही चर्चा झाली. त्यामुळे मडकईकर पुन्हा आमदार मोन्सेरात यांच्या गटात जाणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या बैठकीत मडकईकर यांनी रस्ता डांबरीकरणाचा विषय उकरून काढला होता. त्यावेळी त्यांनी कंत्राटदारावर निशाणा साधला होता. आमदार किंवा महापौर यांच्याबाबत त्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारल्याची चर्चाही महापालिकेत होती. त्यामुळे आता जुने साथीदार पुन्हा एकत्रित येणार, अशी चिन्हे दिसतात.

जुने साथीदार एकत्र येणार

राजकारण आणि मैत्रीबाबत आमदार बाबूश मोन्सेरात हे तत्त्व पाळणारे आहेत, असे त्यांच्या जवळचे सहकारी सांगतात. मडकईकर यापूर्वीही त्यांच्यापासून दुरावले होते, पण पुन्हा मोन्सेरात यांच्याशी त्यांनी जुळवून घेतले. आता पुन्हा ते त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते.

जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे मडकईकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. टोनी रॉड्रिग्स यांच्याशी सख्य असल्याने त्यांनी ताळगावात काँग्रेसच्या प्रचारात सक्रियपणे सहभाग दर्शविला होता. परंतु महापालिका ताब्यात असल्याने आणि राज्यात बाबूश हे मंत्री असल्याने दोघांनाही जुळवून घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे काही नगरसेवक नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT