Ponda police arrestes bike thief  Dainik Gomantak
गोवा

Ponda Police News: दुचाकी चोरट्याला अटक; चौकशीतून आणखी दोन दुचाकी चोरल्याचे आले समोर, तिन्ही गाड्या जप्त

फोंडा पोलिसांची कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Ponda Police News: फोंडा पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक केली. अनिकेत परेरा (वय 19) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून एकूण ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. फोंडा पोलिसांनी परेरा याला गवणे येथून ताब्यात घेतले.

याबाबत 13 जुलै रोजी रामचंद्र नाईक (वय 50 वर्ष) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांची दुचाकी Honda Activa स्कूटर (GA-05-N-1143) गवणे येथून अज्ञाताने चोरली होती. 28 जून रोजी सकाळी दहा ते 29 जून रोजी साडेसात वाजेपर्यंतच्या काळात ही दुचाकी चोरीला गेली होती.

या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्यानंतर पाळत ठेऊन दुचाकी चोरट्याला अटक केली. अनिकेत अँथनी परेरा (वय 19) असे चोरट्याचे नाव आहे. तो कुठ्ठाळी येथील रहिवासी आहे.

त्याच्याकडे चौकशी केल्यावर आणखी दोन दुचाकी चोरींच्या घटनांत त्याचा सहभाग असल्याचे समोर आले. त्याने स्वतः याची कबुली दिली आहे. त्यामुळे एकूण तीनही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यातील एक स्पेंडर मोटरसायकल आणि एख डीओ स्कूटर आहे.

फोंड्यातील पोसिस निरीक्षक तुषार लोटलीकर, हेड कॉन्स्टेबल केदारनाथ जलमी, देविदास पर्येकर, पोलिस कॉन्स्टेबल आदित्य नाईक, अमेय गोसावी या पथकाने चोरट्याला अटक केली. तसेच सुमारे दोन लाख रूपये किंमतीच्या चोरीला गेलेल्या तीन दुचाकी त्यांनी हस्तगत केल्या.

संशयित आरोपीला कोर्टासमोर सादर करण्यात आले. कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया, एसडीपीओ आशिष शिरोडकर, पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT