Goa Rain Accident Dainik Gomantak
गोवा

हवेली-कुर्टी येथे आंब्याचे झाड कोसळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

जखमी दुचाकीस्वार मनिषकुमार (वय 35) हा हवेली येथून आपल्या खोलीवर परतत असताना अचानक झाड कोसळले आणि तो झाडाच्या फांदीखाली दबला गेला.

दैनिक गोमन्तक

फोंडा : गोव्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पावसामुळे पडझड होत आहे. फोंड्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे पडझड सुरु असून आज शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास हवेली - कुर्टी येथे वाऱ्यामुळे आंब्याचे झाड अचानक कोसळून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

जखमी दुचाकीस्वार मनिषकुमार (वय 35) हा हवेली येथून आपल्या खोलीवर परतत असताना अचानक झाड कोसळले आणि तो झाडाच्या फांदीखाली दबला गेला. यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला असून, त्याला त्वरित उपचारासाठी फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ आणि तेथून पुढील उपचारासाठी बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान फोंडा मतदार संघाचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीची पाहणी केली. फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी झाड हटविले.

दरम्यान, मडगावात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडल्याने नगरपालिका अवरासह स्टेशन रोड परिसर आणि अन्य भाग पाण्याखाली गेल्याने लोकांची धांदल उडाली. नगरपालिका आवारात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वाटच नसल्याने या परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. नगरपालिका उद्यानाचा फुटपाथही पाण्याखाली गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: 'अव्वल'साठी गोवा मैदानात, कुचबिहार क्रिकेट स्पर्धेत चंडीगडविरुद्ध लढत

गोव्यात पोट भरणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणावर प्राणघातक हल्ला; झारखंडच्या संशयिताला पणजीत अटक

Goa Today News Live: सर्वत्र खंडणी, भ्रष्टाचार! गोव्यातील आणखी एका भाजप नेत्याचा सरकारवर आरोप; केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

SCROLL FOR NEXT