Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू; ट्रकचालकाला अटक

मयत दुचाकीचालक मूळ उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील असून आणि ट्रकचालक मूळ राजस्थानातील आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या राजुराम शांतलाल (29) या युवकाचा हॉस्पिटलमध्ये दाखल करीत असताना मृत्‍यू झाल्‍याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी एका ट्रकचालक विक्रम प्रताप सिंग याला अटक केली आहे. (two wheeler driver dies in accident police arrests truck driver)

मिळालेल्‍या माहितीनुसार, गेल्या रविवारी तेंबी-राय या ठिकाणी ट्रक फोंड्याहून (Ponda) मडगावच्या दिशेने येत होता. त्याच बाजूहून मयत राजुराम शांतलाल हा आपली दुचाकीने मडगावच्या (Margao) दिशेने येत होता. ओव्‍हरटेक करण्‍याच्‍या प्रयत्‍नात ट्रकचालक विक्रम प्रताप सिंग याने दुचाकीला मागाहून धडक दिली. यात दुचाकी चालकाला गंभीर दुखापत झाली होती. लगेच त्‍याला रुग्‍णवाहिकेतून मडगाव येथील जिल्हाधिकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मयत दुचाकीचालक मूळ उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील असून आणि ट्रकचालक मूळ राजस्थानातील आहे. राजुराम शांतलाल हा फोंडा येथील शांतीनगर येथे राहत होता. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविण्याप्रकरणी ट्रकचालकावर भारतीय दंड संहितेच्‍या 279 आणि 304 (अ) कलमांअंतर्गत मायणा-कुडतरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT