Debris At Mapusa Highway Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापशात महामार्गालगत टाकाऊ भराव टाकणारे 2 ट्रक जप्त; दहा हजार दंडासह वाहतूक परवाना निलंबित

बार्देशच्या मामलेदारांनी केली कारवाई

Akshay Nirmale

Debris at Mapusa Highway: म्हापसा येथील महामार्गालगत बेकायदेशीररित्या टाकाऊ भराव (डेब्रिस) टाकणारे दोन ट्रक बुधवारी जप्त करण्यात आले. बुधवारी दुपारी बार्देशच्या मामलेदारांनी हा कारवाई केली.

पोलिसांनी हे दोन्ही ट्रक जप्त केले आहेत. तसेच या दोन्ही ट्रकचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

हे दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले आहेत. या ट्रक चालकांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच वाहन चालकांचा वाहतूक परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला आहे.

बार्देशचे मामलेदार प्रवीण गावस यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या ट्रकना डेब्रिस टाकतानाच पकडले. ग्रीनपार्क ते तार जंक्शन मार्गावर सर्व्हिस रोडलगत हा प्रकार सुरू होता. बेती व सुकूर येथील कंपनीकडून हे साहित्य टाकले जात होते.

त्यांच्याकडे विचारणा केल्यावर ट्रकचालकांना उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांना माहिती देऊन त्यांना ताब्यात घेतले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपकडून खोटे दावे करून मतदारांना वगळण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांचा आरोप

Viksit Bharat 2047: युवकांनी राजकारणात यावे, 'विकसित राष्ट्रा'साठी CM प्रमोद सावंतांचे आवाहन

Goa Noise Pollution: वागातोरला ध्वनिप्रदूषणाचा त्रास! कारवाईकडे लक्ष; ट्रान्स म्युझिक पार्ट्यांमुळे लोक हैराण

Police Recruitment: 800 मीटर धावण्याच्या चाचणीला आव्हान देणारी याचिका न्यायालयानं फेटाळली, 6 उमेदवारांनी घेतला होता आक्षेप

Goa Lokotsav: फूड कोर्ट, चिनी मातीच्‍या वस्‍तूंची अनेकांवर मोहिनी; 'लोकोत्‍सवा'ला स्‍थानिकांसह पर्यटकांचीही गर्दी

SCROLL FOR NEXT