म्हापसा व फोंडा येथील दोन दिवसीय स्वयंपूर्ण युवा महोत्सवातून किमान दोन हजार रोजगार (Employment) उपलब्ध होईल,
म्हापसा व फोंडा येथील दोन दिवसीय स्वयंपूर्ण युवा महोत्सवातून किमान दोन हजार रोजगार (Employment) उपलब्ध होईल, Dainik Gomantak
गोवा

स्वयंपूर्ण युवा महोत्सवातून दोन हजार रोजगार: मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

फोंडा: राज्यात ‘स्कील एम्प्लॉयमेंट स्टार्टअप’ (Skill Employment Startup) आणि अनुदान अशा स्वरूपाचा लाभ स्वयंपूर्ण युवा माध्यामातून रोजगारासाठी करून देण्यात येणार असे सांगून म्हापसा व फोंडा येथील दोन दिवसीय स्वयंपूर्ण युवा महोत्सवातून किमान दोन हजार रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी व्यक्त केला.

फर्मागुढी-फोंडा येथे गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या संकुलात श्रम व रोजगार मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्वयंपूर्ण युवा उपक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. त्यावेळी त्यांनी युवकांशी संवाद साधला. रोजगार मंत्री जेनिफर मोन्सेरात, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे, गोवा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्कर खांडेपारकर तसेच रोजगार मंत्रालयाचे अधिकारी भालचंद्र केंकरे आदी उपस्थित होते.

टिकेची पोस्ट शेअर करू नका

सावंत म्हणाले, सुसंस्कृत गोव्याचे भवितव्य गोमंतकीय युवकांचे आहे. बाहेरून येऊन ते आम्हाला शिकवण्याची गरज नाही. गोव्याची नवी सकाळ गोमंतकीयांच्या हातात असून सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमातून ते सिद्धही झाले आहे. माझ्यावर कितीही टीका झाली तरी समृद्ध गोव्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. युवकांनीही केवळ टीकाच शेअर करू नये तर सरकारचे उपक्रमही शेअर करावेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सहा महाविद्यालयांत स्पर्धा केंद्र

सहा महाविद्यालयांत स्पर्धा केंद्र सुरू करण्यात आले असून युवकांनी त्याचा लाभ घ्यावा. स्पर्धात्मक परीक्षेत गोव्याची सरासरी कमी आहे. गोव्यातील युवकही कमी पडू नये, यासाठी सरकारने हा उपक्रम सुरू केला असून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

युवकांची फिरकी

स्वयंपूर्ण युवा उपक्रमात मुख्यमंत्र्यांनी युवकांची चांगलीच फिरकी घेतली. सरकारच्या योजना कुठल्या वेबसाईटवर आहे ते सांगा असे युवकांना विचारल्यावर केवळ चार हात वर आले. शेवटी एकाने कसेबसे उतर दिले. त्यावर कुणीच कसे अपडेट नाही, असे विचारून आधी सरकारच्या योजना उपक्रमांची माहिती करून घ्या, फक्त नोकऱ्यापुरते सीमित राहू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly: वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी सौरऊर्जेवरील फेन्सिंग उभारा; डॉ. दिव्या राणे यांची मागणी

Goa Assembly: आवश्यक तेथे सुरक्षारक्षक,स्वच्छकांची लवकरच नेमणूक; मुख्यमंत्री सावंत

Goa Assembly: वाळपई बालभवन केंद्राच्या नूतनीकरण आणि विस्ताराची नितांत गरज; डाॅ. दिव्या राणे

जंगलात साखळदंडाने बांधलेल्या 'त्या' अमेरिकन महिलेबाबत पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड, पोलिसही चक्रावले

Colva Police: गुन्ह्याची कबुलीसाठी डोके भादरले, नख उपटले! कोलवा पोलिसांवर आरोप

SCROLL FOR NEXT