Morjim Beach Goa  Dainik Gomantak
गोवा

Morjim Beach: नववर्षाच्या प्रारंभी दोन सागरी कासवांनी घातली 193 अंडी

Morjim Beach: कितीही ध्वनी प्रदूषण झाले तरीही सागरी कासवांवर कसलाच परिणाम झाला नसल्याचे नुकतेच दिसून आले.

दैनिक गोमन्तक

Goa News: कितीही ध्वनी प्रदूषण झाले तरीही सागरी कासवांवर कसलाच परिणाम झाला नसल्याचे नुकतेच दिसून आले. मावळत्या वर्षात 27 डिसेंबरला एका सागरी कासवाने 98 अंडी घातली होती. त्यानंतर नवीन वर्षात 2 जानेवारीला दोन सागरी कासवाने एकाने 101 तर दुसरीने 91 अंडी घातलेली आहेत.

कासवांच्या अंड्यांची घरटी वन्य विभागाकडून आरक्षित केलेल्या जागेत सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. ही दोन्ही सागरी कासवे २ रोजी रात्री विठ्ठलदास तेंबवाडा किनारी भागात येऊन अंडी घातली.

आणि त्या अंड्यांना सुरक्षा देण्याचे काम वन कर्मचाऱ्यांनी केले. सागरी कासवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने मोरजी-आश्‍वे, मांद्रे हे दोन किनारे संवेदनशील घोषित केले आहेत.

या किनाऱ्यावर शांतता महत्त्वाची असते. सायंकाळी ७ नंतर दिवे पेटवण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे शॅक व्यावसायिक विजेचे दिवे पेटवत नाहीत. मेणबत्ती पेटवून थोडा काळ व्यवसाय करत असतात.

मात्र, काही खासगी जमिनीतील रेस्टॉरंट, क्लब आहेत, तिथे मात्र मोठ्या प्रमाणात प्रखर दिवे पेटवले जातात. विद्युत रोषणाई केली जाते. मात्र,त्याचा कासवांवर परिणाम झाल्याचे आढळले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT