Jail | Arrest  Dainik Gomantak
गोवा

Russian Murder Case: 3 दिवसांत 2 खून! रशियन सिरीयल किलर गोव्यात सतत बदलायचा जागा; पोलिसांनी आवळला तपासाचा फास

Russian Serial Killer Goa: दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्यांनी राज्य हादरले असतानाच, या प्रकरणातील मुख्य संशयित आलेक्सेई लिओनोव याच्या विरोधात पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्यांनी राज्य हादरले असतानाच, या प्रकरणातील मुख्य संशयित आलेक्सेई लिओनोव याच्या विरोधात पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. सोमवारी मांद्रे पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडासाठी वापरलेली धारदार हत्यारे जप्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आलेक्सेई डिसेंबर महिन्यात गोव्यात आला होता. हरमल, मांद्रे, मोरजी आणि कोरगाव या पर्यटन भागात तो सतत ठिकाणे बदलून राहत होता. रशियन महिलांशी मैत्री करून तो त्यांचा विश्‍‍वास संपादन करायचा. नंतर शारीरिक संबंध ठेवायचा. त्यांच्याकडून पैसे उकळून निर्घृणपणे त्यांची हत्या करायचा.

आलेक्सेईने १४ जानेवारी रोजी मोरजीतील मधलावाडा येथे ‘एलिना’ नावाच्या रशियन महिलेचा खून केला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत, १६ रोजी हरमल परिसरात त्याने ‘एलिना’ नावाच्याच दुसऱ्या रशियन महिलेचा गळा चिरला. एकाच नावाच्या दोन महिलांच्या हत्यांमुळे तो ‘सीरिअल किलर’ असण्याचा संशय पोलिसांना आहे.

सतत जागा बदलत असल्याने सुरुवातीला पोलिसांना त्याचा माग काढणे कठीण गेले. सध्या आलेक्सेई पोलिस कोठडीत असून त्याचा व्हिसा व पासपोर्टची पडताळणी सुरू आहे. गोव्यात त्याने आणखी किती गुन्हे केले, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे पर्यटन भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संशयिताची कार्यपद्धती

आधी मैत्री, मग विश्‍‍वास संपादन

शारीरिक संबंधांनंतर पैसे उकळणे

काम झाल्यावर हत्या करणे

तत्‍पूर्वी गोड बोलून त्‍यांचे हात मागून बांधणे

सतत ठिकाणे बदलून वास्तव्य करणे

दुहेरी हत्येचा थरार

१४ जानेवारी : मधलावाडा-मोरजी येथे पहिली हत्या

१६ जानेवारी : हरमल येथे दुसरी हत्या

दोन्ही महिलांचे नाव ‘एलिना’

हत्या : धारदार शस्त्राने गळा चिरून

संशय : सीरिअल किलर असण्याची शक्यता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: अमली पदार्थ तस्करीचा डाव उधळला! काणकोण पोलिसांकडून 4.31 लाखांचे 'चरस' हस्तगत, 29 वर्षीय व्यक्ती अटकेत

Siolim Lake: शिवोलीवासीय जिंकले! तलावात भर घालून बांधकाम करण्याच्या प्रयत्नाला दणका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

Borim Bridge: 'लोकांनाही विकास हवा आहे, त्यासाठी त्यांना विश्‍वासात घेतले पाहिजे'; बोरीतील रस्त्याच्या अडचणी अन् मंत्र्यांचे आश्‍वासन

Goa Latest Updates: जाणून घ्या गोव्यातील घडामोडी; राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि महत्वाच्या बातम्या

Luthra Brothers: लुथरांवरील सदोष मनुष्यवधाचे ‘105कलम’ चुकीचे! वकिलांचा दावा; काय केले युक्तिवाद? वाचा..

SCROLL FOR NEXT