Crime  Dainik Gomantak
गोवा

Crime News: रशियन तरुणीवरील अत्याचार प्रकरणी संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी

सिसीटिव्हीचा आधार घेत संशयितांना केली अटक

दैनिक गोमंतक

कळंगुट: कळंगुट येथे रशियन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन नेपाळी तरुणांना अटक केली आहे. आज संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित तरुणी सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे.

(Two Nepali youths remanded in police custody for seven days in Calangute rape case )

शुक्रवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी कळंगुट येथील एका खाजगी हॉटेलात रशियन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. पोलिसांनी हॉटेल सिसीटिव्हीचा आधार घेत संशयित आरोपींना बारा तासांच्या आत अटक केली असून, साकील अन्सारी तसेच साहिमुद्दीन अन्सारी अशी या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता पर्यटनासाठी गोव्यात रशियातील 18 पर्यटकांच्या गटासमवेत दाखल होत मैत्रीणीसह रिसॉर्टामधील एका खोलीत उतरली होती. दरम्यान मैत्रीण आपल्या मित्रांसमवेत रिसॉर्टच्या आवारात फिरायला गेली असता हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच पिडीत महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या तपासणीचा अहवाल लवकरच अपेक्षित असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT