TMC

 

Dainik Gomantak 

गोवा

मडगावचे दोन नगरसेवक तृणमुलमध्ये दाखल

घनश्याम शिरोडकर व महेश आमोणकर या मडगावच्या दोन नगरसेवकानी आज तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: एकेकाळी आमदार दिगंबर कामत यांचे समर्थक असलेले मात्र मागच्या नगरपालिका निवडणुकीच्यावेळी हे संबंध बिघडलेले घनश्याम शिरोडकर व महेश आमोणकर या मडगावच्या दोन नगरसेवकानी आज तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दिगंबर कामत (Digambar Kamat) याना जिथे पाठिंबा जास्त आहे अशा मोती डोंगर आणि खारेबांध या भागातील हे दोन्ही नगरसेवक असल्याने त्यांचे तृणमुल (TMC) पक्षात जाणे कामत याना काही प्रमाणात अडचणीचे ठरू शकते. आज या दोन्ही नगरसेवकांचे तृणमुलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझींन फालेरो आणि राज्यसभा खासदार डेरीक ओब्रायन यांनी स्वागत केले. यावेळी काँग्रेस (Congress) पक्षातून यापूर्वी तृणमुल पक्षात सामील झालेल्या मडगावच्या माजी नगराध्यक्ष डोरिस टेक्सेरा याही उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना शिरोडकर यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावर टीका करताना मागच्या पाच वर्षात ते फक्त मॅच फिक्सिंग करण्यात व्यस्त असल्याने मडगावचा विकास खुंटला. मडगावचे आता भले व्हावे या एकमेव इच्छेने आपण तृणमुल पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. मडगावचा बाजार, बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, पार्किंग प्रकल्प अशा प्रकल्पाकडे कामत यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी शिरोडकर यांच्या बरोबर प्रसाद नावेलकर, तकवी सय्यद, सुरेश कारापूरकर, मुसा शेख, अमर कंटक, मिनाझुद्दीन, अब्दुल कादर गाझी व अर्जुन हात्रिकी हेही तृणमुल पक्षात सामील झाले. महेश आमोणकर यांनीही आपण मडगावच्या विकासासाठी तृणमुल पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. त्यांच्या बरोबर शिवोली येथील बॅडमिंटनपटू आशुतोष नाईक यांनीही तृणमुल पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना फालेरो यानी तृणमुल पक्षाकडे गोव्याला पुढे घेऊन जाण्याची निश्चित दिशा असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT