Durgs Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धुळेर येथे दोन लाखांचे अंमलीपदार्थ जप्त

Mapusa: सापळा रचून एका युवकास अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

धुळेर-म्हापसा येथे अंमलीपदार्थविरोधी पथकाने काल सकाळी 9 च्या सुमारास सापळा रचून कामुर्ली-बार्देश येथील फैयाझ बाबूसाब नडाफ या तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून एक किलो गांजा व 120 ग्रॅम हशिश तेल जप्त केले. या अंमलीपदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 2.20 लाख रुपये असल्याची माहिती या कक्षाचे उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांनी दिली.

पोलिस गस्तीवर असताना धुळेर येथे एका तरुणाला झडती घेतली असता त्याच्याजवळ ड्रग्ज आढळून आले. त्याने हे ड्रग्ज विक्रीसाठी आणले होते. त्याने हे ड्रग्ज कोठून आले याची माहिती उपलब्ध केली नाही तरी पोलिस कोठडीतील चौकशीत त्याची माहिती मिळवली जाईल. संशयित फैयाझ नडाफ या मूळचा हुबळी - कर्नाटक येथील असून गेली अनेक वर्षे तो कामुर्ली - बार्देश येथे त्याच्या वडिलांच्या घरात राहते.

संशयित फैयाझ नडाफ हा यापूर्वी वाहन चालक होता. त्यानंतर त्याने काही दिवस सेल्समनची नोकरी केली होती. झटपड पैसा मिळवण्यासाठी त्याने नोकरीबरोबरच ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करू लागला होता. त्याने स्कूटरच्या डिकीमध्ये गांजा व हशिश तेल लपविले होते. त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT