Goa illegal Hoarding dainik gomantak
गोवा

Goa Illegal Hoarding म्हापशात फक्त दोनच बेकायदेशीर होर्डिंग्स?

माहिती अमान्य: नवे प्रतिज्ञापत्र देण्याचे निर्देश

दैनिक गोमन्तक

Two illegal hoardings in mapusa: पणजी महापालिका क्षेत्रासह पालिका व पंचायत क्षेत्रातील बेकायदा होर्डिंग्सविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुरू असलेल्या स्वेच्छा याचिकेवरील सुनावणीवेळी म्हापसा पालिकेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीने धक्काच बसला.

म्हापसा पालिका क्षेत्रात फक्त दोनच बेकायदा होर्डिंग्स असल्याची माहिती देण्यात आली होती, ती मान्य करणे शक्य नाही.

त्यामुळे पालिका मुख्याधिकाऱ्यांनी बेकायदा होर्डिंग्सची सविस्तर माहिती नव्याने प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश दिले आणि याचिकेवरील सुनावणी येत्या 8 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

पणजी महापालिकेने आतापर्यंत बेकायदा होर्डिंग्सबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केला.

मांडवी नदीच्या बाजूने असलेल्या तरंगत्या कसिनोंच्या व्यवस्थापनासह इतर काही हॉटेलच्या होर्डिंग्सप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती खंडपीठाला देण्यात आली.

महापालिकेच्या नोटिशीला आव्हान दिलेल्या काही कॅसिनोंच्या अर्जावरील सुनावणी सध्या प्रलंबित आहे.

बहुतेक सर्व कॅसिनो व्यवस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी केलेली एलईडीची रोषणाई तसेच चमकते दिवे काढले आहेत.

अहवाल द्या !

महापालिकेने एका कॅसिनोचे होर्डिंग्स काढले आहेत. त्यामुळे तूर्त तरी वाहन चालकांना या होर्डिंग्स किंवा या एलईडी दिव्यांमुळे होत असलेला त्रास थांबला आहे.

त्यामुळे शहरातील इतर ५ कॅसिनोंविरुद्ध महापालिकेने सुरू केलेल्या कठोर कारवाईला खंडपीठाने आज स्थगिती दिली. खंडपीठाने महापालिकेला कारवाईचा अहवाल सादर करण्यास दिलेली मुदत संपलेली नसल्याने पुढील सुनावणीपर्यंत तो सादर करण्याचे निर्देश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT