Two horrific accidents within boundaries of Ponda police station Dainik Gomantak
गोवा

फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत दोन वेगवगेळ्या अपघातांत दोघे ठार

तिस्क-उसगाव व दाबोळी-शिरोडा येथे भीषण अपघात

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत तिस्क - उसगाव व दाबोळी - शिरोडा येथे झालेल्या दोन विविध अपघातात दोघेजण ठार झाले, तर एक किरकोळ जखमी झाला. हे दोन्ही अपघात काल (मंगळवारी) घडले. तिस्क - उसगाव येथील अपघातात ठार झालेल्या दुचाकीचालकाचे नाव महेश वासुदेव गावडे, तर दाबोळी - शिरोडा येथील अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव जावेद जब्बीर शेख असे आहे.

तिस्क - उसगाव येथील अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास जीए - 05 - डी - 5906 या क्रमांकाची कारगाडी व जीए - 05 - एच - 2052 या क्रमांकाच्या दुचाकी यांच्यात घडला. तिस्क - उसगाव येथे फार्मसीसमोरच चालकाने कारगाडी थांबवली व अचानक दरवाजा उघडला. नेमका याचवेळेला मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराची जोरदार धडक कारगाडीच्या दरवाजाला बसली आणि तो रस्त्यावर फेकला गेला. कारगाडीचा दरवाजा दुचाकीचालक महेश गावडे याच्या डोक्याला धडकल्याने त्याला जबर दुखापत झाली. रस्त्यावर फेकल्यानेही त्याला अन्य दुखापती झाल्या. त्यानंतर लगेच त्याला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल केले असता संध्याकाळी साडेचारच्या सुमारास त्याचे निधन झाले.

मूळ केरळ राज्यातील पण सध्या कसलये - तिस्क उसगाव येथे राहणाऱ्या कारगाडीचा चालक टॉम अब्राहम झेवियर (वय 31) याने अचानकपणे कारचा दरवाजा उघडला, त्यामुळेच हा अपघात झाला आणि दुचाकीचालक महेश गावडे याला आपला प्राण गमवावा लागला. कारचालकाने दरवाजा उघडण्यापूर्वी मागे वळून पाहिले असते, तर हा अपघात झाला नसता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मयत महेशच्या पश्‍चात आई, पत्नी व एक लहान मुलगा असून तो रोजंदारीवर काम करीत होता.

दाबोळी - शिरोडा येथील अपघातात सावर्डेहून फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या जीए - ०५ - टी - २६७० या क्रमांकाच्या ट्रकची फोंड्याहून सावर्डेच्या दिशेने जाणाऱ्या जीए - ०७ - एए - ९९५३ या क्रमांकाच्या दुचाकीशी टक्कर झाली. या अपघातात दुचाकीचालक साफीकूर रेहमान (वय २२) व दुचाकीच्या मागे बसलेला जावेद जब्बीर खान (वय २४) दोघेही (मूळ उत्तर - प्रदेश येथील, पण सध्या शांतीनगर - फोंडा येथे राहणारे) रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात जावेद खान हा ट्रकच्या खाली आल्याने जागीच ठार झाला, तर साफीकूर रेहमान हा किरकोळ जखमी झाला. दोघेही एअर कंडिशनर टेक्निशियन होते. फोंडा पोलिसांनी या दोन्ही अपघातांचा पंचनामा केला असून कारचालक व ट्रकचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मृतदेह बांबोळी शवागारात ठेवण्यात आले आहेत. फोंडा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

Raksha Bandhan Wishes in Marathi: राखीच्या धाग्यात गुंफलेलं मायेचं नातं... रक्षाबंधननिमित्त भावा-बहिणीच्या नात्यातील जिव्हाळा वाढवणारे 'या' खास शुभेच्छा संदेश

India-America Relations: 'भारतासोबतचे संबंध खराब करु नका...'! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ नितीवरुन अमेरिकन खासदाराने फटकारले

Raksha Bandhan: 'या' देवांना राखी बांधा, संकटाना दूर पळवा! जाणून घ्या रक्षाबंधनाचे महत्व

SCROLL FOR NEXT