Electoral Bonds To Parties In Goa Dainik Gomantak
गोवा

Electoral Bonds To Parties In Goa: गोव्यातील दोन प्रादेशिक पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्समधून मिळालेत 90 लाख रुपये

Electoral Bonds To Parties In Goa: गोव्यातील देखील दोन प्रादेशिक पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्समधून 90 लाख रुपये मिळाल्याचे उघडकीस आले आहे.

Pramod Yadav

Electoral Bonds To Parties In Goa

सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्याची सूचना केली होती. त्यानंतर 15 मार्च सायंकाळपर्यंत याबाबत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, मुदतीपूर्वीच आयोगाने माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून, भाजपवर निवडणूक रोख्यांचा वर्षाव झाल्याचे समोर आले आहे. तसेच, गोव्यातील देखील दोन प्रादेशिक पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्समधून 90 लाख रुपये मिळाल्याचे उघडकीस आले आहे.

कोणत्या राजकीय पक्षाच्या निवडणूक रोखेच्या माध्यमातून किती पैसे मिळाले याची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संकेतस्थळावरील माहितीनुसार गोव्यातील दोन प्रादेशिक राजकीय पक्षांना निवडणूक रोखेच्या माध्यमातून 90 लाख रुपये मिळाले आहेत. हे दोन पक्ष दुसरे कोणते नसून गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष आहे.

Goa Forward Party

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गोवा फॉरवर्डला 35 लाख रुपये मिळाले आहेत. तर, महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाला निवडणूक रोखेच्या माध्यमातून 55 लाख रुपये मिळाले आहेत.

गोव्यातील काही कंपन्यांनी निवडणूक रोखे खरेदी केले असून, गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष हे गोव्यातील दोनच प्रादेशिक पक्ष आहेत ज्यांना निवडणूक रोखेच्या माध्यमातून पैसे मिळाले आहेत.

Maharashtrawadi Gomantak Party

दरम्यान, निवडणूक रोखे योजनेचा सत्ताधारी भाजप सर्वात मोठा लाभर्थी ठरला असून, त्याखालोखाल तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती यांना सर्वाधिक रोखे मिळाले आहेत.

आम आदमी पक्षाला २४५ रोखे मिळाले असून महाराष्ट्रात शिवसेनेला ३५५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १२१ रोखे मिळाल्याचे प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीतून समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT