Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa : केक शॉपचे आमिष; फोंड्यातील महिलेला तब्बल 7 लाखांचा गंडा

राज्यात फसवणुकीच्या दोन घटना समोर आल्या आहेत

Rajat Sawant

Goa Crime : राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. समाजमाध्यमांवरील सुरक्षेच्या उपाययोजना माहिती नसल्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. अशातच गोव्यात फसवणुकीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये फोंडा येथील महिला व आंध्र प्रदेशातील पर्यटकाला गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुध्द गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फसवणुकीच्या पहिल्या प्रकरणामध्ये एस्कॉर्ट सेवा देण्याच्या बहाण्याने आंध्र प्रदेशामधील एका पर्यटकाला गंडा घालण्यात आला आहे. एस्कॉर्ट सेवा देतो असे सांगून पर्यटकाकडून 40 हजार रुपये उकळण्यात आले. पर्यटकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पणजी पोलिसांत तक्रार नोंद केली असून पणजी पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पणजी पोलीस अधिक तपास करत आहेत

फसवणुकीच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये मोंजिनिसची फ्रेंचाईसी देतो असे भासवून फोंडा येथील महिलेला गंडा घालण्यात आला आहे. तब्बल 7 लाख 15 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने सायबर विभागात तक्रार दाखल केली असून सायबर विभागात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सायबर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

SCROLL FOR NEXT