Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: पणजीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चुरस! 2 माजी नगरसेवक मैदानात; मिनीन डिक्रुझ आणि सुरेंद्र फुर्तादो यांचा तिकिटासाठी दावा

Panaji Congress Ticket Contenders: विधानसभा निवडणुकीत पणजीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी अगोदरच माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विधानसभा निवडणुकीत पणजीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी अगोदरच माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आता त्यांच्या जोडीला काँग्रेस कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक मिनीन डिक्रुझ यांनीही आता या उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस नक्की कोणाला उमेदवारी देणार हे त्या-त्यावेळीच स्पष्ट होणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद गिरीश चोडणकर यांनी स्वीकारल्यापासून सुरेंद्र फुर्तादो यांनी पणजीत आपण काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचे आणि वरिष्ठ आपला उमेदवारीसाठी विचार करतील, असे सांगत आले आहेत. काँग्रेसची पणजीत साधारण साडेचार-पाच हजार हक्काची मते आहेत. तीच मते पणजीतील आमदार ठरवत आली आहेत, त्यातील निम्मी मते ज्या उमेदवाराकडे वळतात, तो उमेदवार पणजीचा आमदार होत आला आहे.

काँग्रेसचा प्रबळ उमेदवार पणजीत मिळाला तरच त्याच्यामागे ही मते जातात, असे आत्तापर्यंतचे चित्र आहे. परंतु निवडून येण्याची क्षमता उमेदवारामध्ये आहे की नाही, याचा विचारही हा मतदार करीत आला आहे. लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असल्याचे फुर्तादो सांगतात. पण अजूनही ते मध्य पणजी, आल्तिनो, मळा, रायबंदर परिसरात पोहोचले नाहीत, असे तेथील लोक सांगतात.

कोण काय म्हणाले?

माजी नगरसेवक मिनीन डिक्रुझ यांनी पणजीमधून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दावा केला असून, काँग्रेसकडून मला पुढे जाण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. उमेदवारीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि पणजीची उमेदवारी आपणासच मिळेल, असा आत्मविश्वास ते व्यक्त करीत आहेत.

सुरेंद्र फुर्तादो यांनी उमेदवारीसाठी केलेल्या दाव्यावर मिनीन म्हणाले, सुरेंद्र यांच्याबद्दल माझी काहीही हरकत नाही. कोणीही उमेदवारीसाठी दावा करू शकते; अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. जर सुरेंद्र यांना उमेदवारी मिळाली, तर मी नक्कीच त्यांना पाठिंबा देईन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Asian Games: भारत अन् आशियाई पदकं; अंतिम क्षणी का चुकतो 'सुवर्ण' निशाणा? क्रीडा संस्कृतीत बदलाची गरज

Kendra Drishti Yoga 2026: करिअरमध्ये येणार सोन्याचे दिवस! केंद्र दृष्टी योग 'या' राशींना करणार मालामाल; 2 ऑक्टोबरपासून मिळणार अफाट यश

IT ची हाय-फाय नोकरी सोडली, बंगळुरुत चालवते रॅपिडो ऑटो, कॉर्पोरेट नोकरीपेक्षा कमावते जास्त पैसे; आईसाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल

पाकिस्तानात सुरक्षेची ऐशीतैशी! दरोडेखोरांनी थेट खेळाडूंच्या बसलाच केलं टार्गेट; बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी अन् मारहाण

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT