Land grab case  Dainik Gomantak
गोवा

Land Grab case: पुरातत्व विभागाच्या दोघा कर्मचाऱ्यांना पणजी सत्र न्यायालयाकडून जामीन

जमिन हडप प्रकरण; 20 हजाराच्या वैयक्तिक जातमुलचलक्यावर जामिन

Akshay Nirmale

Land Grab Case: जमिन हडप प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पुरातत्व विभागातील महेश नाईक आणि धीरेश नाईक यांना पणजी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

प्रत्येकी वैयक्तिक २० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तथापि, चौकशी अधिकाऱ्यांसमोर दोन दिवस चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने दोघाही संशयितांना दिले आहेत.

जमिन हडप प्रकरणांचा तपास करत असलेल्या एसआयटीने महेश नाईक आणि धीरेश नाईक फोंडा येथील व्यावसायिक अनिल नाईक याला अटक केली होती. पैकी महेश मड्डू नाईक पुरातत्व खात्यात बाईंडर म्हणून कार्यरत आहे. तो मडकईचा रहिवासी आहे.

तर धीरेश गंगाराम नाईक आणि अनिल आनंद नाईक हे दोघेही फोंड्यातील बांदोडा येथील रहिवासी आहेत.

कळंगुट येथील सर्व्हे नंबर 26/9 आणि 466/2 येथील जमिनींच्या मालकी हक्कात त्यांनी खोट्या दस्तऐवजांच्या आधारे फेरफार केल्याचा आरोप आहे. दिनेश आणि महेश हे पुरातत्व खात्यातले कर्मचारी आहे. पैकी धीरेश याला यापुर्वीही जमिन घोटाळा प्रकरणात अटक झाली होती.

दरम्यान, या प्रकरणांच्या चौकशीसाठी सरकारने निवृत्त न्यायाधीश व्ही. के. जाधव यांच्या एकसदस्यीय आयोगाची नेमणूक केली आहे. ईडीसी पाटो-पणजी येथील ‘स्पेस’ इमारतीत कार्यालय सुरू झाले आहे.

आयोग या प्रकरणातील पोलिसांच्या प्रत्येक तपासकामाची पडताळणी करणार आहे. त्यातील त्रुटींची माहिती पोलिसांना देऊन त्यावरील निर्णय पुढील चार महिन्यांत घेण्याची अट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT