Two Bikes Accident at Bodde Bicholim Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: ड्युटी संपवून घरी जाताना काळाचा घाला; बोर्डेत अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच अंत

Bicholim Goa Accident: दोघे जखमी; ओव्हरटेक करताना झाला अपघात

दैनिक गोमन्तक

Two Bikes Collide At Bicholim: डिचोलीत दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा भीषण अपघात गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास साष्टीवाडा-बोर्डे परिसरात घडला. मृत दुचाकीस्वार उसप गावातील असून, त्याचे नाव श्रीराम शंकर गावकर (वय ३७ वर्षे) असे आहे.

तो वीज खात्याचा कर्मचारी असल्याची माहिती मिळाली. ड्युटी संपवून घरी जाताना साष्टीवाडा-बोर्डे येथे श्रीरामवर क्रूर काळाने झडप घातली. त्याच्या पश्‍चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. श्रीराम हा दुचाकीवरून अस्नोड्याच्या दिशेने जात होता.

बोर्डे येथे समोरील दुचाकीला ओव्हरटेक करताना त्याच दुचाकीला त्याची दुचाकी धडकली. त्यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. श्रीरामचे डोके रस्त्यावर आपटून तो अत्यवस्थ झाला. त्याने घटनास्थळी उलटीही केल्याची माहिती मिळाली.

अपघात घडल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका पोचण्यास अर्धा तास उशीर झाला. चोडण येथून रुग्णवाहिका आली. जखमी श्रीरामला आरोग्य केंद्रात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोलीचे उपनिरीक्षक विश्वेश हडफडकर पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT